Friday, 28 December 2012

डान्स..

पाच सव्वापाच झाले असतील.. नुकताच चहा झालेला
येउन टेकतो तोच फोन वाजला..
"Hello Sweet"
"Yes Mitto"
"एक serious गोष्ट आहे.."
"हा बोल"
"आज कितीला भेटशील?"
"तू सांग"
"९:३०?"
"बात क्या है?"
"भेटल्यावर सांगतेच कि.. चल मी पळते."
खट्याक!! One of the serious conversation we ever had..
पोहोचोस्तोवर नेहमीप्रमाणे ४ वेळा misssed calls झालेले..
पार्सल उचललं आणि जवळच्या कॉफी शॉप मध्ये जाऊन बसलो.
खेचाखेची सुरु करणार तर आज थोडी down वाटली..
"काय झालंय मित..?"
"काही नाही रे!"
मग २ आढे वेढे घेऊन गाडी रुळावर आली.
"अरे तुला जरा लवकर यायला जमू शकतं का?"
"कशासाठी?"
"अरे actually i need your support!"
"ही ही ही"
"पहिले म्हण नाही म्हणणार नाहीस!"
"नाही!!"
"अरे यार जोक नको ना रोह्या, प्लीज"
"ok बोल"
"मला डान्स क्लास लावायचाय!"
"लाव कि मग, बेस्टे!"
"जोडीवाला डान्स! Salsa"
"नेहा नी लावला ना? बरोबर?"
"फालतू उत्तर नाय पाहिजे!"
"माझ्याकडचे पैसे संपलेत राव.."
"मी भरते!!!"
मला शॉक बसला.. मामला १०० % serious होता..
"अरे मित पण अचानक हे काय काढलंस..?"
"हे बघ! ह्या माझ्या राहून गेलेल्या गोष्टी आहेत.. आणि तसाही मी कधी डान्स नाही शिकले.. so.. why not?"
"रे बेटा, पण salsa का?"
तिनं position बदलली.. हातात हात घेतले.. डोळ्यात डोळे घातले.. मला धडकी भरली!
"खरं सांगू.. मी पण कधी ह्या गोष्टींचा experience नाही घेतलेला.. 
पण i guess ज्याच्यावर आपण एवढं प्रेम करतो, 
त्याच्या कुशीत शिरून हलके हलके झुलण्यात जो आनंद आहे, आपलेपणा आहे, 
secure feeling आहे.. तुला नाही वाटत?"
तिचे चमकणारे डोळे फार बोलके होते.. बोलताना एक क्षणही भिरभिरले नव्हते..
तिचे हात किंचित दाबत तिच्या डोळ्यांना म्हणालो.. "I love you mittt"
मग तिचं अपेक्षित स्मित हास्य.. मी ह्याचीच तर केव्हापासून वाट बघत होतो..
"तू आधी का नाही सांगितलस मग? आपण घरच्या घरी जरा हातपाय चालवले असते कि!"
"कुणाच्या घरी चालवणार..?"
"ह्म्म्म तेही आहेच.. ठीके.. लावू आपण.. अजून काय फर्माईश..?"
"आहे! तू जिम लाव यार .. १०० वेळा सांगून झालंय माझं.. ह्या Jan पर्यंत काहीही कर."
"त्याचे पैसे?!!"
"आता माझे पैसे संपले!"
"Kamineee..!"
गप्पा सरकत राहतात.. वेळ उद्यासाठी नोंद होत राहते..

- रोहित

आईशप्पथ कविता..!!


मी अव्यक्त आहे,
आसक्त नाही.
तुला भेटावेसे वाटते,
पण विचारात कोणतेही,
गैर कृत्य नाही.

अगदी हातात हात घालून,
बोलावेसे वाटते,
तुला सोबत घेऊन,
चालावेसे वाटते,
पण तुझ्या मनात नसतांना,
तुझ्या मनाविरुद्ध वागणारे,
माझे रक्त नाही.

खूप स्वप्ने रंगवली आहेत,
जी सांगायाचीयेत तुला..
खूप इच्छा सजवल्या आहेत,
ज्या मागायच्याहेत तुझ्याकडे..
पण तुझ्या नकार भरल्या नजरेपुढे,
माझी हिम्मत नाही.

तुझा रस्ता माहीत असतांनाही,
मी आडोश्याला उभा राहत नाही.
तू पुढे चालतांना कधी,
तुझ्या मागे चालत नाही.
कारण नसतांनाही कारण काढून,
तुझ्याशी बोलायला येत नाही.
इतरांकडेही तुझा विषय टाळतो,
शक्यतो तुझ्या बाबतीत मौनच पाळतो.
तुला आठवत ठेवण्याचा,
अजिबात अट्टाहास करत नाही.
पण तू दिसलीस कि मनात वादळ उठतं,
चेहऱ्यावर एकही तरंग दिसत नसेल कदाचित,
तरी तुला बघतांना मनी काहूर पेटतं.
पण मी बोलत फक्त नाही.

हल्ली माझ्या अव्यक्तपणालाही भाषा आलीये,
इतरांसाठी तो प्रश्नाचाही विषयही असेल,
आजकाल तुझ्या नकार भरल्या नजरेतही संभ्रम दिसतो..
पण मला बघून तू कधीही रस्ते बदलू नकोस,
आपल्या प्रेमाला त्रास देईन एवढा मी उन्मत्त नाही.

- अमोल

Wednesday, 26 December 2012

Why not you..

तू का नाही? why not you??
विसरलास ते ४ दिवस.. ती चांदण्यातली रात्र..?
खरंच.. एकतर नशिबानी जुळून आलेली तिची माझी भेट..
एवढा गोंधळलेलो कि तिनं विचारलेले "तुझे class teacher कोण?" एवढ्या साध्या प्रश्नाला अडखळलेलो..!
तसे दोघेही एकाच junior कॉलेजचे.. वेगळ्या तुकडीतले.. 
जाताना येताना दिसायची कधीतरी.. कधी cycle stand ला.. कधी कॉलेजच्या पाणवठ्यावर..
दिसली कि गालभरून smile द्यायची.. मस्त खळी पडायची तिला.. 
एकदा चोरून नंबर मिळवलेला आणि बहाणा करून फोन केलेला.. कसल्यातरी xerox काढायच्या म्हणून..
बहुतेक ती माझी पहिली हिम्मत असावी.. दुसऱ्या दिवशी ती गर्दीत उभा राहून माझ्यासाठी xerox काढताना दिसलेली..मग तिला आणि तिच्या मैत्रिणीला चॉकलेट्स घेऊन दिलेली..
पुढं.. पुढं काही झालंच नाही आमच्यात.. गणिताच्या क्लासला होती ती.. पण फार तर फार तिची वही नेण्यापलीकडे काहीच न घडलेलं..
का कुणास ठाऊक.. पण एवढे चतुर आम्ही नव्हतोच.. फक्त न्याहाळायचोच फार..
तिच्या उमलत्या हृदयात आमच्यासाठीच्या प्रेमाच्या कळ्या फुलल्याही असतील कदाचित.. पण आम्ही वेचायला होतोच कुठे तिथे.. आम्ही आमच्याच दुनियेत सैरभैर..
आता ऐकतोय तिच्यासाठी गुपचूप वरसंशोधन चालू आहे म्हणून..
आणि हे सर्व जाणून असलेला माझा मित्र त्रासून मला विचारत असतो.. why not you..

- रोहित

Tuesday, 18 December 2012

निरोप..


इथे तरी तू चूक कबूल करावीस
किमान आणि खूप किमान
इथेतरी...
खूप  झाले दिवस दाखवून
तुझे माझे दिवस आठवून
जे काही सुखावलंस.. त्या  सुखांची
तू परतफेड करतीयेस
अगदी डोळे ओले करेपर्यंत
काही एक हक्क  नाहीये तुझा
एवढं सगळं देऊन परत हिरावून घेण्याचा
इतकी कशी निष्ठुर तू
सगळंच कसं  विसरलीस
एका क्षणात
जमलंच कसं तुला
अजून कळवळतोय तुझ्या जाण्याने
अजून  भान थाऱ्यावर नाहीये
विसरतोय.. अडखळतोय.. धडपडतोय
वर येतोय.. असं  वाटतंय.. जमतंय.. जमत नाहीये..
बाहेर तर यावंच लागणार
वाट पाहणारेही आहेत अजून
तू सोडून
ज्यांना  मी सोडलं
तुला धरून
खूप झालं तुझं प्रेम
खूप झाला दिखावा
तुझ्यासोबत  नाही तर तुझ्या आठवणींसोबतही नाही
तुझ्या आठवणींसोबत तर नक्कीच नाही

-  रोहित

मामा तुझं गाव..


लहानपणी फार तर फार माझ्या मामाचं पत्र हरवायचं
दिवस बदलत गेले आणि आता मामाचं गावच हरवलंय
इथे शेजारीच राहतो माझा मामा
आणि जवळ जवळ दोन मावश्या
एवढी जवळ प्रेमाची नाती आली आणि
तेवढीच दूर त्याची गोडी गेली

लहानपणी आठवतंय,
मामाचं गाव सोडून जाताना
त्याच्या अंगणातला छोटा दगड खिशात घेतलेला
उर भरून आठवण आली की डोळे भरून साठवायला
त्याची छोटी पोरं, केलेली मजा.. त्या दगडात दिसायची
कडी, कोयंडे घासताना तुझ्या बागेतल्या झोपाळ्याचा आवाज यायचा
आणि आठवण काढताना कधी कधी मुद्दाम वाजवायचा
खरं सांगू मामा,
खूप खूप आठवण यायची तुझी
जेव्हा मैलोनमैल लांब होतास
आणि आज जेव्हा चार हातांवर आहेस तर ती आस नाही
आठवड्यातून एकदा भेटायचा पण त्रास नाही
दुराव्यातला गोडवा तो हाच का
उगाच आलास इतक्या जवळ तू मग
लांब असतानाच्या तुझ्या आठवणी त्रास द्यायच्या
पण तुझ्या आठवणींनी दिवस रंगवून द्यायच्या
अगदी त्या रंग भरायच्या पुस्तकासारख्या..

- रोहित

तुझ्या शब्दांचा वेडा..


का ग मन माझं तुझ्याभोवतीच घुटमळतंय
झाले गेले शब्द मधून पुन्हा पुन्हा आठवतंय
माझ्या आनंदाचे मला काहीच न देणे घेणे
तुझ्या केवळ स्मितासाठी माझं जग खळखळतंय
आणि सगळं माहित असून
आणि एवढं सगळं माहित असून
तुझे दुरून डोंगर साजरे गं
असलं कसलं जगणं माझं.. तुझ्यावरचं मरणं
आणि तुला त्याचं काहीच न घेणं देणं
एक क्षण.. फक्त एक क्षण पुरा तुला
माझ्यापासून दुरावण्यासाठी
आणि तो मलाही पुरा होईल
आयुष्यभर झुरवण्यासाठी
वेडा.. मीच वेडा
तुझ्या माझ्या भेटीतल्या शब्दांचा मी वेडा

- रोहित

सुखद नजारे..


आज तुझे photos पाहिले
तुझ्या birthday चे photos
3 दिवस चाललेल्या उत्सवाचे photos
तुझे आणि त्याचे..
एक क्षण दुखावलो.. फक्त एक क्षण
पण सावरलो लगेच..
म्हटलं चला.. Atleast तुला तरी कुणी भेटलं
मग परत वाटलं
हे असंच असतं ना गं
जीवन हा प्रवासच असतो,,, रेल्वेचा प्रवास..
आणि मागे जाणारे, सुखद नजारे ही माणसे..
जसा तुला मी आणि मला तू...
प्रवासाचा मूड बनवून गेलेली माणसे,
मागे गेलेले नजारे सोडून पुढचे उपभोगायचे, मागचे विसरायचे
जसं तू विसरलीस,
मला नाही जमलं..
मी मागचेच आठवत बसलो..
आठवणीत कुढत बसलो.,,
पुढचे उपभोगायचे सोडून..
सौंदर्य हे असण्यावर नाही दिसण्यावर असतं..
तू म्हणायचीस...
सगळं सगळं कळतंय..
तरी तू पुढे आणि मन मागे पळतंय,,
ह्याचसाठी पकडलेली का ही train,
मला train बदलायचीये,,,,
तुझ्यासोबत नजारे बघायचेत..
ह्या सुंदर आयुष्याचे..
बोल.. थोडी येशील मागे
माझ्यासाठी....

- रोहित

सुरुवात ..


का आज हृद्य पुन्हा श्रावण घेऊन आलाय
पाने सळसळलीयेत आणि हवेत गारवा दाटून आलाय
कोरड पडलेल्या माळरानावर का मोर नाचून गेलाय
झडलेला गुलमोहर आज पुन्हा बहरून आलाय
तुझ्या येण्याने आज झरे पाझरू लागलीयेत
निगरगट्ट पाषाणातून मने पाझरू लागलीयेत
आणि लख्ख प्रकाश पडलाय.. मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यातही
जळमटे उडालीयेत, किलबिल पाखरे उडालीयेत
तुझ्या येण्याने जग कसं बहरून आलंय
तुझ्या येण्याने..
एक नवी सुरुवात झालीये, जगण्याची..
जग नव्याने बघण्याची..

- रोहित

एक कविता दगडावर ...

मला नव्हतं करायचं असं,
तुझ्यापासून पळायचं असं
तुलाही माहितीये,
माझ्यापेक्षाही जास्तच..
पण तरीही तू छेद दिलेस,
नको एवढे भेद केलेस..
मला अपेक्षित नव्हतं..
atleast तुझ्याकडून तरी..
हे असं होणार,
जाणून असावीस बहुधा तू!
किवा तू बिनधास्त असणार..
परिणामांपासून.....
एक मात्र समजलं,
तुझ्या विश्वाला,
काही तडे गेले नाहीत..
मी असतानाही तुझं काही पान हललं असेल,
मला वाटत नाही.....
कुठून बनवून घेतलंयस हृदय,
जरा मलाही कळूदे..
मी हि दोन छर्रे मारून घेतो म्हणतो,,
थिजलेल्या काळजावर..
हि कविताही निष्फळच..
बहाल तुझ्यावर..!
जसा नारळ वाहिला,
रेखीव दगडावर...!!
जसा नारळ वाहिला
रेखीव दगडावर.......

- रोहित

रात झिंगलेली..


शब्दावाचून जे
क्षण चांदण्यात शिंपलेले
न घडल्या कहाण्या साऱ्या
तुझ्या वाचून विणलेले

मधहोश झिंगलेल्या
रातीचा आलम सारा
सुगंधलेल्या आठवणी
तुझ्याभोवती पुन्हा पिसारा

जगावे तरी कसे
प्रश्न गंजलेले..
पुन्हा साठलेले
पुन्हा वेचलेले..

मदिरा ती कशाला
ना गरज कस्पटांची
यांच्याविनाच आम्ही
स्वैर झिंगलेले..
स्वैर झिंगलेले....


- रोहित

उत्तर..


खुप त्रास देतोय ना मी
वेड्यासारखा करतोय ना मी
माहितेय मला..
मुद्दामच करतोय मी..
मी संभ्रमित आहे..
मला संभ्रमित केलंयस.. तू
एका गोष्टीवरून..
तुझ्या दुनियेत माझं स्थान हललंय तेव्हापासून..
मला एक पुरावा हवाय,
एक साधा पुरावा..
बस.. गाडी पुन्हा रुळावर येईल
पण तू..
तू जाणून सर्व निरागस बनतेस
माझी भीती वाढत चाललीये..
आणि ओघाने दुरावेही..
हे सर्व आता तुझ्या हातात आहे..
प्रश्न आता माझ्या स्वाभिमानाचाही आहे..
मी असा येऊ शकत नाही..
तुझ्या उत्तराशिवाय..
आलो तरी मी तिथे नसेन..
खोटं का असेना,
मला उत्तर हवंय..
मला तुझं उत्तर हवंय....

- रोहित

आज मी जरा निवांत असेल..


आज.. आज मी जरा निवांत असेल..
तुझ्या reply ची वाट पाहात असेल..
शेवटचा कौल जो माझ्या हातात होता,
काल रात्रीनंतर..
आता तुझ्या हातात असेल..
पाहेन मीही आता,
किती हवा आहे तुला
की आपल्यात जी झाली,
ती होती पोकळ हवा
काळीज धडकत आहे, विचार सुरु आहेत
उजव्याने नाही तर डाव्याने तयारी करत आहे
पण मी निवांत असेल..
फार तर फार होऊन काय असेल..
दोन घटका आवंढा,
डोळ्यात पाणी असेल..
आणि नेहमीसारखंच कुणाला समजेन तोवर
पटकन पावसात पाणी पुसलेलं असेल..
आज मी तुझ्या reply ची वाट पाहात असेल..
आज मी जरा निवांत असेल..

- रोहित

प्रश्न.. तुझा माझा..


कळत कसं नाही गं तुला
मला काय पाहिजे ते
नको ते तर्क लावत बसतेस
सांगितलं तरी वेडं बनतेस
मुद्दाम करतेस ना..
मला चिडलेलं बघायला..
मला त्रास होतोय ग ह्या सगळ्यांचा..
Please थांबव हे..
आजपर्यंत खूप फरफट झालीये,
नको एवढी घुसमट झालीये,
तू वेगळा खेळ मांडू नकोस आता..
आजवरच्या उन्हातल्या प्रवासात,
तूच एक सावली वाटलीस मला..
मी निश्वास टाकलाय..,
तू केवळ आल्यापासून..
Please, आपलं म्हण मला..
दुरूनच सही, जवळ कर मला..
एवढा तरी नक्कीच अधिकार आहे मला,
माझ्या आजवरच्या तुझ्या प्रेमाखातर..
तुही जाणतेस हे..,
आणि जर का वेगळं वाटत असेल,
काही जास्त मागतोय असं वाटत असेल,
तर निघून जा इथून..
नको तुझा खोटा दिलासा..
खोट्यानी ठगायचा छंद असेल तुझा
खऱ्याशी जगायचं स्वभाव आहे माझा
जगायचं कसं, बघेन मी माझा..

- रोहित

शायराना..

कितनी घड़ियाँ बीत गयी
वोह नज़र आये नहीं
पूछे निगाहें गुजरी बात है कोई
वोह नज़रे मिलाने पास आये नहीं

वोह इंतेजार करते रहे, हम आये नहीं
रोज-दराज की चीजें, आज वहां थी नहीं
कहाँ तो था, कुछ वक़्त तो बीत जाने दो
ये दिल ही कमबख्त, किसीका कहाँ मानें नहीं

कितना भी दूर जा मुझसे तू..
कितनी भी होने दे खामोशियान..,
हम वोह परिंदे है,
जो आशियाने भूलाते नही..

है अगर चाहतें दिलों में, तो कैसी ये तनहाइयाँ
है अगर नफरतें जो भरी, तो क्यूँ ये नजदीकियाँ
क्या पाओगे ऐसी कर नादानियाँ
लड़ जाने दे नैन, मिट जाने दे ये दूरियाँ

- रोहित


Monday, 17 December 2012

शायरी..


कभी ऐसा भी होगा, ऐसा न सोचा था कभी
मिलने की आस लगाये रहे थे बरसों से
वोह आस आसुओंमें बरस जायेगी, ऐसा न कभी सोचा था
सामने होकर भी अंजान बन पायें, ऐसा कभी न सिखा था
अगर ये भी सिख जातें, तो येह अंजानापन न होता था
इतने बुरे भी हम नहीं, ना हि तुम हो, येह जानते है हम
फिर भी इतने बुरे हम बन जायेंगे, इतना बुरा न तुम्हे सोचा था
एक बार पुछ लेते अपने दिल से, तो ऐसा जवाब न आता था
तुमने पत्थर है थामा सिनेमे, ऐसा दिल न हमने सोचा था
कभी ऐसा भी दिन आयेगा, ऐसा दिन न कभी सोचा था

- रोहित

Monday, 10 December 2012

No more tears..!

बस करो यार..
अब no more tears!
लढना बिछडना..
no more fears
खुप झालं मागे झुरणं बिरणं..
आधं अधुरं जगणं मरणं..
यायचं असेल.. चल ये
नसेल.. double बेल दे
कुठे आठवण काढत बसता..
झिजलं नशीब, झिजवत बसता..
तिच्या मनात सुद्धा तुम्ही नसता!!
सोड नाद, चल गाडी बदलू
मुंबई नाहीतर परळ पकडू
final  स्टेशन एकच ठरवू..
मुखडा तेवढा हसत मिरवू.!
Be happy go lucky.. 8) 

- रोहित

Saturday, 8 December 2012

Thought..

Beauty of a person is not always a red bulldozer on a corner of road that you can figure out easily, 

Sometimes it can be a very small butterfly on a huge garden and if you somehow find it out, you cannot get away from the person whom it belongs... :)

- Rohit

Saturday, 1 December 2012

पाउस..


पावसाचा आवाज.....
पानांवर पडणारी टपटप
गडगडणारे आभाळ.....
कुणाशीही काहीही न देणं घेणं या पावसाचं
तरी काळजावर झिरपणारं, पानांवरून ओघाळणारं पाणी....
कुठल्याश्या जुनाट आठवणी..
तिनं यावेळी गायलेली गाणी..
सारं सारं अगतिक...
दाराच्या कोयंडयावर बसलेला मी..
हातभर अंतरावरचं चिंचेचं झाड..
पक्ष्यांची फडफड, कसलीशी धडपड
आणि पाउस........
पीत राहायचं हे बाहेरचं गीत,
मन भरून वाहेपर्यंत..
कुणी सांगावं.. 
पुढचा पाउस माझा असेल.. नसेल
हे दोन क्षण ओंजळीत साठवून घेणार मी
मनाचा तो ही कोपरा भिजेपर्यंत...
माझ्या पुढच्या पावसापर्यंत..

- रोहित


Wednesday, 28 November 2012

अश्या रात्र प्रहरी..


दिवस कितीही व्यवहारी गेला तरी
रात्री थोडं senti व्हायला होतं
एकांतात मन खोलवर जातं
आणि मागे वळून पाहायला होतं

अश्या चांदण्या रात्रीत
थोडं घुटमळणं होऊन जातं
आकाशाच्या खजिन्यावरती
भाळणं होऊन जातं

अश्या मोहक रात्री
रातराणीचं झुलवणं होतं
कितीही रुसलं फसलं तरी
दुखरं मन भूलवणं होतं

अश्या हलक्या रात्री
माथ्यावारले भार उतरवायला होतं
भरले सारे रांजण ओतायला होतं
मन वाहायला होतं

अश्या मंद प्रहरी
थोडं थांबणं होऊन जातं
जगत तर असतोच
पण थोडं जगणं होऊन जातं

- रोहित

College life..


College life संपलं आणि जगण्याचा oxygen च संपला
दिवस आता राहिलेत नुसतेच रटाळ..तेचतेच
झालाच जरा वेगळा तर जीवावर उठणारे..
कॉलेजात असतानाच्या सकाळ सुखद असायच्या..
आपसूक अंथरूनातून उठवायच्या..
कसली तरी उमेद असायची त्या उठण्यात
आज तोच जरा प्रयत्न करून बघितला..ती सकाळ जरा जागवायला बघितली, नाही जमलं...
वेडा होतो मी..कधी एकदा college  संपतंय याची वाट पाहणारा
कॉलेजात असताना आठवतंय..
मनात नसताना study room मध्ये अभ्यास केलेला... नावालाच!
वेळ नसताना शेवटपर्यंत concept clear केलेला...शेवटचा paper ही तसाच  दिलेला!!
पोरं पण एक एक नग
एकेकाचे वेगळेच पैलू,वेगळंच गणित..
प्रत्येकाला पदव्या बहाल केलेल्या..
प्रत्येकजण आपापल्या कामात हुशार..
पाहिजे ते lecture  नेमके miss  झालेलं..
टुकार lecture  मन मारून attend केलेलं..
सगळं सगळं आठवतंय....
आज तेच lecture miss करतोय... त्यातला आनंद miss  करतोय..
त्या दिवसात जगताना हवेत oxygen असायचा..
आज तो सोडून सगळे हवेत आहेत..!!

- रोहित

Tuesday, 27 November 2012

ढगातली नाती..

का कुणास ठाऊक
पण काही वाटलंच नाही मला
तुझ्या लग्नाची बातमी
उडत उडत आलेली
अन तशीच उडत गेलेली
कुठेही न शिवता..
२ वर्षांचा लेखाजोखा
२ क्षणात संपलेला..,
इतकी उथळ नाती...
विट आलाय आता
हृदयात जाणारी कंपनं,
हृदयातच सामावणारी नाहीत राहिली आता
सगळं क्षणिक वाटतं आता..
नाराज.. नाराज तर तसाही नाहीये मी
फक्त हताश झालोय थोडा,
या ढगातल्या नात्यांशी..
मान खाली अन मुसक्या बांधाव्यात आता
अन फिरावं गोल गोल
कुणाशी न देणं घेणं
फक्त जात्यातलं जगणं
फक्त जात्यातलं जगणं..

- रोहित

Friday, 23 November 2012

चारोळ्या..१

तुझ्याविना क्षण
क्षणांविना मन अडते
सरतेशेवटी मनाविना
माझे जगणेच टांगते

असावा असा समुद्रकिनारा
असावे फक्त तू अन मी
वेचण्या धन डोळ्यांतले
असावे पारखी.. तू अन मी

आहेच तसा मी
वरकरणी जगणारा
गप्प गप्प राहून
खूप काही करणारा

पाण्याच्या थेंबातही  मी तुला पाहिले होते
सळसळत्या वाऱ्यालाही भान तुझे राहिले होते
दरयाखोरयात वाहिलेल्या आकांत सादाला
मी कणाकणाने झिजलेले प्रतिसाद पाहिले होते

मी तुझ्यात राहिलो
राहताना पहिले
असे दिस सुखाचे
सरताना पहिले

खूप काही बोलायचं होतं
सगळं काही राहून गेलं
वाहते दिवस सोबत म्हणून
मन माझं वाहून नेलं

तुझ्या प्रेमळ आठवणींना
रात्रीस केव्हातरी जाग आली
क्षण ना क्षण जोडत गेले
अन रात्रीची सकाळ झाली

दिवसांमागून वर्षे सरली
एकच उल्का शोधत होतो
त्या वळणांवर वावरताना
माझा गलका उगाच होतो

कुठे होतीस तू
मला परत वाटलं नाही
तू कधी परत येशील
हेच मला पटलं नाही

मनी माझ्या साठलेलं 
खूप काही वाटलेलं 
बेभान असं एक पिलू 
सैरावैरा सुटलेलं

निवांत क्षणी एखाद्या राती
खोलवर खळबळ चालायची
गावभर फिरून आलो कि
झोपच मला रागवायची

उगाच का ग सांग मला
सोन्यात हिरा जडवायचा
उगाच का बघून तुला
गाव मला चिडवायचा

- रोहित

चारोळ्या..

रात्र नाही, तुही नाही, चंद्र नाही सोबती
तू दिलेल्या मोगऱ्याच्या गंध नाही सोबती
सांग या तारांगणातून मी मला रमवू कसा
तारका न्याहाळण्याचा छंद नाही सोबती..

छेदण्या कडवी शिबंदी, पीर वेडे पाहिजे
भेदण्या पाषाण कट्टर, नीर वेडे पाहिजे
शक्य आहे काहीही! बस्स.. निश्चयाचे बळ हवे
वेधण्या निष्प्रेम हृदया, तीर वेडे पाहिजे!

बुलंद झुंज घेईन सागराशी, फक्त भरती पाहिजे
झुंज देईन वादळाशी, फक्त धरती पाहिजे
मांडले अवघ्या जगणे वैर.., तरी सोसेन मी
संगतीला प्रियतमा अन.. चंद्र वरती पाहिजे!

Wednesday, 21 November 2012

मी न माझा..

आता असं वाटतं..
कालपरवापर्यंत जे झरे आतुर होते,
वाटेत येणाऱ्या प्रत्येक क्षणाला भिजवायला..,
ते झरेच आता सुकत चाललेत..
ती निरागसता, ते अर्थपूर्ण जगणं
मनाच्या definition मध्ये बसणारा पूर्णविराम..,
थोडा लांबत चाललाय आता...
बाकी सारवत असतो मी तसा
वरची जमीन बाकी जपून असतो मी,
आतली कस्पटे कितीही माजली तरी..
मजेत दिसतो मी तसा..
स्वत:च्याच आसवांची केलेली लक्तरे,
लोंबतात आतल्या आत..
बंद डोळ्यांनी दिसतात त्या मशाली
आठवतो तो प्रारंभ..
डौलाने फडकणारी निशाने..,
आणि दिसतो तो आजचा दिवस
एवढा ढिसाळ मी का झालो...
मी शोधणं सोडून दिलंय आता
माझ्यात माझं असणं मी सोडून दिलंय आता..

- रोहित

Friday, 16 November 2012

वेडी..

ती.. आपल्याच दुनियेत राहणारी.. 
लोक काहीही म्हणोत.. बिनधास्त जगणारी..
उगाचच शायनिंग स्माईल न देणारी.. गाल भरून हसणारी..
बोर जोक मारणारी.. तरीही वारसा जोमाने चालू ठेवणारी..
acidity झाली म्हणून चहा बंद करणारी.. पण टपरीवर सोबत म्हणून गप्पा मारायला येणारी..
वाढलं वजन तरी कौतुक म्हणून सांगणारी..
तीच तीच smiley शब्दात परत फिरवणारी..
अलिबाग वरून आलेली, काशीद ला जाणारी
पोरींचा लोंढा गरगर फिरवणारी
ज्याला जसं वाटेल त्याला तशीच वाटणारी
आणि चाहत्या लोकांमध्ये भरभरून प्रेम उधळणारी.. एक वेडी

- रोहित

 ;P

Tuesday, 13 November 2012

कधी तू.. रिमझिम झरणारी बरसात..

- ..I think you are too loyal to you emotions huh..?
- माहिती नाही का.. पण तशी बाहुली सापडलीच नाही कधी..
- सापडली नाही का तू शोधली नाहीस?
- अश्या गोष्टी शोधून मिळतात??!
  कसंये बघ ना..,
  बूट, चपला, कपडे सगळं आपल्या मापाचं मिळतं..;
  नसेल तर बनवून घेता येतं..
  या गोष्टी नाही मिळत.. नाही?..


दुरियाँ..

दुरियाँ तो वोह जरिया है मेरे दोस्त
तेरी चाहत की आरज़ू सजती है जहाँसे
पर इतना भी न तड़पा उसे की लगे
तुझ सा बेवफा यहाँ कोई नहीं

- रोहित


Sunday, 11 November 2012

एक और बात..


मी आणि माझा एक मित्र.. एखाद्या शनिवारी, रविवारी बोलायला बसलो कि काय आनंद असतो देव जाणे.
पण आठवडाभर त्रासलेली गणिते जुळवायचा कार्यक्रम होऊन जातो.
एखाद्या विषयाच्या मुळात जाऊन problem solve करू पाहणारी समीकरणे काढू पाहतो..
बऱ्याचदा बरोबर असणारी. फार थोड्या वेळेला फसणारी. 
हि खलबते चालतात रात्री ११ च्या पुढेच. सगळं  काही सामसूम असताना. 
मुळात असल्या गप्पांना रात्रच हवी. दिवसा ह्या गप्पांवर बोलायला कुणाला वेळ नसतो अन मूडही. 
मग अश्या रात्रीच्या वेळी फिलोसोफ्या बाहेर येतात. प्रेम प्रकरणे रंगतात. 
ती अशीच वागते. तसंच करते. मग तू एक काम कर. ह्या वेळेला तू असंच कर. आयच्या गावात मग बघ.. 
रंगत जाणारी चर्चा रंगतच जाते. सिगारेटी शिलगावल्या जातात. 
प्रचंड टेन्शन असल्यासारख्या सुरात धूर हवेत विरतच राहतो. 
जो ऐकतो त्याच्या ऐकण्याच्या इंटरेस्टचा जास्त प्रश्न नसतो. 
सांगणाऱ्याला ऐकणारयाचा हवा असतो कान. आणि थोडी सहानुभूती.. 
इथे जुळणारी नाती थोडी गहीरीच असतात.., दिवसभर फसलेल्या नात्यांपेक्षा..!! 
एका हाकेवर गरजेला धावणारे बरेचसे मित्र असेच बनतात. 
चांदण्यात नेहमीच्या ठरलेल्या कट्ट्यावर जमताना, थोडे त्याचे चटके शेअर करताना, थोडे आपले सांगण्यात जी मजा असते; भलेही उद्याच्या practical जगात ते फंडे लागू होईलच याची शाश्वती नाही पण तो relief कुठेतरी मनाच्या कप्प्यात पाणी शिंपडत राहतो. 
त्याची जमीन कितीही तापत राहिली तरी..!

- रोहित



Wednesday, 7 November 2012

शेर २..

एक खता है, तन्हाईसी है दिल में बैठी कही
एक बैचेनी ही, दबी दबी सी सहमी हुई
एक बात है, जो दिलने ठानी वोह बनी नहीं
एक बात जो जहन में रह गयी, जुबाँ पे नही
- रोहित

Monday, 5 November 2012

शेर..

तू टोके भी तो एक मजा है
तेरी ख़ामोशी में मेरी सजा है
बरसते है दूर बादल, तड़पते है हम
ये तडपती बैचेनियाँ, यही तेरी रजा है।

- रोहित

Saturday, 3 November 2012

माझं पहिलं प्रेम..


माझं पहिलं प्रेम
Love at first sight!!
आजूबाजूचं जग गायब होतं क्षणभर..
बाहुलीच होती ती .. शब्दशः बाहुली
सोनेरी केस.. उन्हात रंगलेले
मागे गेलेली एकच वेणी.. जीवघेणी!
हसू जरासं फसलेलं.. गावाला कळून चुकलेलं
पण पाहणाऱ्याला आठवण करून देणाऱ्या
मोगऱ्याच्या शुभ्र कळ्या.. गालभर पसरलेल्या
एखाद्या खोल दरीत घेऊन जाणारे डोळे..
टपोरे काळेभोर डोळे..,एखाद्या हरिणीचे असतात तसे..
स्वभाव.. स्वभाव काही कळला नाही पण
तेवढं मात्र राहूनच गेलं..
पण घोळक्यात फिरायची नेहमी
शेजारीशी बोलायची, अन डोळे चुकवायची नेहमी
एखाद्याला आसमंत दाखवणारी, अस्मानिची अशीच ती
सगळ्यांना भुरळ पाडेल अशी ती.., माझं पहिलं प्रेम..

- रोहित

Friday, 2 November 2012

यूह ही..


महफिले सजी है, सजी और होती
चाहते खिली है, खिली और होती
कमी नही है कुछ, देखे जो निगाहे
पर अगर तुम जो होते
तो बात.. कुछ और होती
तो बात.. कुछ और होती..

- रोहित



Thursday, 1 November 2012

मैत्री आपली..


तुला माहितीये
एक तर आधीच विरह दुःखात असायचो
आणि त्यात तूझ्यावरून डोकं उठायचं
झकास वाटतंय आता..
तुझ्यामुळेच..!!
तू....  तू माझ्या लक्षातच आली नाहीस
भांडणं आणि चिडवण्यातच वेळ गेला माझा
हो ना!!
मूर्ख वाटायचीस तू मला
अगदी मनापासून..  
अगदीच चुकीचं आहे असंही नाही
पण मस्त वाटतीस आता तू..
अलीकडे बरीच उलगडत गेलीस तू मला
तुझं हसणं.. आपल्याच दुनियेत असणं
तुझं रुसणं.. कुणाच्या कानात फिसफिसणं
सगळंच मस्त वाटायला लागलंय..  
तुझी जायची वेळ आली आणि माझी जागं व्हायची
.... तरीही आवरेल मी स्व:ताला
असाच तडा नाही जाऊन देणार 
असंच हसत राहू..
भांडत राहू... लटक्या रागाने..
आणि ओरडता रागवतानाही,
असंच फिद्कन हसू..
डोळ्यातल्या डोळ्यांमध्ये....   

- रोहित

पिंपळपान..



त्या कोवळ्या जीवांचं आयुष्य..
किती सुंदर असतं ना..
दिवस कसा सुंदर आठवणींचा अल्बम असायचा..
रात्र जास्त कधी पाहिलेलीच नसायची
एका सुंदर दिवसानंतर
त्याची गरजही नसायची..
ना बळजबरी, ना लपवाछपवी
एक मोकळं रान..,
आणि त्यात सोडलेलं मोकळं फुलपाखरू..
आपल्याच नादात हिंडणारं..
एका वर्गात बसणारं..
आणि गाव सारं फिरणारं..
दिवसही कसे हलके फुलके..
पिसांसारखे..
भुर्रकन उडून जाणारे..
आनंदाने रंगलेले..
किती आले किती गेले,
पण कधीही न मोजलेले..
पदरात अलगद येऊन पडलेले..
आठवणीत राहील कायमची,
जपून ठेवील..,
ही इवलीशी दुनिया..
बुकातल्या पिंपळपानासारखी..

- रोहित

तुझं न येणं..


आज तू येणार नाहीस
आज.. आज जसा सूर्य उगवणारच नाही
आज पक्षांची किलबिल नकोशी वाटणार
आज.. आज फक्त असणार.. वाट पाहणं.. निरर्थक असं
माहित असूनही तुझ्या वाटेकडे डोळे लाऊन बसणं..
आज तुझी किंमत नव्याने कळणार..
आधीचीच लाखमोलाची तू..
आज तू अनमोल होणार..
तुझ्या चाहुलींना आज कशाचीच तुलना नसणार..
तुझं न येणं .. आणि माझं झुरणं..
हे दिवसभर चालणार..
हे असं दिवसभर असणार....

- रोहित



Wednesday, 31 October 2012

क्षणभंगुर..



सगळं किती क्षणभंगुर झालंय ना आज
प्रचंड volatile असं काही
situation मधून पण काय झपझप बाहेर येतात लोकं
इतकी adaptive कि बास
त्यामुळे कशात गुंतणं, प्रेमात अडकणं, संकटात सापडणं..
प्रश्नच येत नाही
alternatives शोधले जातात
प्रचंड alternatives..
आजच्या पिढीची सोयही आणि फुटकं नशिबही
परिस्थितीशी सामना आला कि मार्गच बदलायचे
त्यामुळे कण्याची झालेली कंदमुळे..
इतकं उपरी जीणं..;
वीट यावा असल्या थोडक्यात जगण्याचा..
मुरणं म्हणजे कशाशी खातात असे पडलेले केविलवाणे प्रश्न
प्रेमाची तर मंडईच झालेली..
खरे अर्थ अवशेषांसारखे पुस्तकात सापडतात फक्त..
खरं सांगू
जन्माला येण्याचा हा काळच फसला मुळी
हि वेळ सगळं उरकून निघायची होती
परत जाण्याची होती
७०-७२ मधील तरुणाईची होती
summer of 69..!!
म्हणजे डोळ्यांनी आज ही पडझड पाहताना एवढा तरी आनंद राहिला असता
कि कितीही नकोशे असले तरी आपले इथले क्षण
क्षणभंगुर.. फक्त क्षणभंगुर

- रोहित

Monday, 29 October 2012

आंधळी कोशिंबीर..


हो हो.., आम्हाला प्रेम पाहिजे!!
याचा अर्थ तुम्हाला काय वाटते,
फक्त तेवढंच जमतं का आम्हाला
हे वयच असे की कुणीतरी लागतं,,
काळजी घेणारं,,,,
जगाच्या रहाटगाड्यात नुकतेच उतरलेले
गांगरलेले, धडपडलेले..
बाहेरून मजेत दिसतील,
पण आतून रक्ताळलेले..
एक पाहिजे कुणीतरी विचारणारं
आपलं... जखमेवर फुंकर तेवढीच..
आणि पुरे होईल तेवढं सुद्धा
खूप झालं एवढंच, दिखावा का असेना..
नाहीतर फिरतात मग तसेच
उघड्या जखमेने..,
जाते चिघळत मग, निरंतर..
जोपर्यंत त्याला दवा नाही..
खरे मासूम तर हे असतात ...
आत वेगळं आणि बाहेर वेगळं..
आणि त्यात परत पडताळणी..,,
पुन्हा पुन्हा..
ही पण निरंतर चालणारी..
अंत पाहणारी..
जगाचा नियमच तो,
जखमी.. अजून जखमी होणार,.
त्याला कोणाचा इलाज नसणार..
लपवणारा लपवत जाणार..
आणि हसतानाही डोळे पुसणार..
सगळीकडेच आंधळी कोशिंबीर..!!

- रोहित

तुझ्यात माझं जगताना...


किती वेदना होतायेत ना..
मीही तडफडतोय..
अगदी तुझ्या इतकाच
लांब राहणं किती अवघड असतं ना
असं डोळ्यांसमोर असताना...
आणि टीचभर हसणंही जड जातं मग
काळीज असं खचताना..,,
आपलं ते हातचंच असतं
कळायचं ते.. माझ्याशी तुझं वागताना
आणि मग मीही मन मोडायचो नाही
तुला फुलात असं जपताना..

किती जपलं ग मी
जाणवलं का तुला..
मागे वळून तरी पहायचंस..
कळलं असतं तुला..
माझी एकट्याचीच झालेली दमछाक......
तुझी गाडी मस्त कलंदर
कुणाची लगाम नसलेली,,,
आणि माझी मागून ससेहोलपट
सारं सुखात टिपण्याची...

तसं एवढंही काही वाईट न्हवतं
निभावून नेता आलं असतं
जुळवून घेता आलं असतं..
पण यावेळी मीच हात आवरला..
म्हटलं बघावी तुझी गोडी
माझ्यातली.. या नात्यातली
पण काय झालं.. कुठे फसगत झाली
काहीच कळलं नाही...
की मीच वेडा होतो
तुझ्या हातचा बाहुला होतो..
माझं स्थानच मला उमगेना..
पहिला ते आजचा दिवस
माझी चूकच मला समजेना ..
माझं जग आता कोसळत चाललंय...
तुझ्यासाठी बांधलेलं ..
आजवरचं प्रेम निखळत चाललंय..
दोघांसाठी सांधलेलं ..
आणि एवढं सगळं होताना
सगळं आपल्या हातानेच पाडताना..
जे घाव होतायेत .. न भरुन येणारे वाटतात
नाही.. आता परत येणार नाही
आणि तु ही येणार नाहीस
तेवढा विश्वास आहे मला
तुझ्या पाषाण हृदयावर..
तुझ्यावाचून आता राहावं लागेल
या रखरखत्या उन्हात..
चालेल..! पण तुझ्या सावलीत पुन्हा येणे.. नाही.. नाहीच....

- रोहित

फक्त जरा किंमत असुद्या..


खरंच..
इतकं सोपं असतं का गं..
आयुष्यात कुणाला एवढं स्थान देणं..
आणि तेवढ्याच सहजपणे ते हिरावून घेणं..
सोप्पं असतं ना फार ..
कुणी आला .. कुणी गेला..
काय फरक पडतो ..
हो ना.. 
चूक तुमची नाहीच मुळात..
चूक आमचीच ..
एवढं प्रेम..  एवढी काळजी..
नको एवढं प्रेम उधळायची सवय..
अंगलट येणारी ...
अतिपरिचयात अवज्ञा करणारी..
पण आम्ही असेच असतो गं,
आतूनबाहेरून सारखेच ..
आडपडदा वगैरे नसणारे ..
ओळखायचं काम खरं तुमचंच..
जवळ करायचं कामही तुमचंच..
खरा खोटा ठरवायचं..
शेवटचा अधिकार तुमचाच..
बरंच काही असतं तुमच्या हातात..
फक्त जरा किंमत असुद्या..
बस.. पुरे आहे आम्हाला..
आणखी काही नको 
आणखी काही नको ..

- रोहित

दुपार..


दूर कुठे जावं..
एकटंच बसावं..,
भल्या दुपारी...
कुठल्याश्या.. गर्द झाडाखाली..
थोडं वेळ द्यावा..
मीच काढलेला.., माझ्याचसाठी..
थोडे सोडावेत निश्वास..
फसवे का असेना..
अन हुंकार.. विसावलेले..
विसरावेत मग उणे दुने..,
आणि माझेच कालचे गुन्हे..
निरखावेत.. धगधगते निखारे
मग थोडं स्मित..
सावलीत असल्याचं..
दोन घोट पाणी..,
आणि विसावून जावं मग...
क्षणभर..
फक्त क्षणभर...

- रोहित

Saturday, 27 October 2012

आपला चहाचा कप..

तुला आठवतं ते आपलं नेहमीचं हॉटेल
आणि तेच सर्वात  मागचं टेबल ..
त्यावर आज थोडी धूळ साचलेली.
हळुवार हात फिरवला ..तर  ..
तेच तू काढलेलं आपलं छोटंसं गाव .....आणि  त्यावर लिहिलेलं दोघांचे नाव....! 
अन ..मन माझं पुन्हा एकदा मागे  गेलं..
अगदी एकदम सर्वकाही काल घडल्या सारखं
जाळीदार पानावर पहाटेचं दव पडल्यासारखं
मला तुझं प्रेम कळावे  म्हणून तू केलेला शब्दांचा खेळआणि  सर्व समजूनही मी राहिलेलो अबोल ....! 
मला आवडणारा ड्रेस तू घातलेला  ..
पण जाणवू दिला नाही मी प्रसंग माझेवर बेतलेला ..
मलाही समजत  होतं..
मी आलेवर ..मी येते म्हणणारी तुझी मैत्रीण हुशार ..आणि तू  दिसलेवर माझे मित्रही होणार लगेच पसार .. 
रोज अजून थोडावेळ थांबू ना  .. बोलणारी तू ...
अन घरी जाण्याची घाई करणारा मी ..
दोघामध्ये एकच  घेतलेला तो चहाचा कप ...!तोही केविलवाणे हसत बघायचा माझेकडे ....! 
डोळ्यात  डोळे घालून ..आयुष्यभर साथ देशील ..
असे विचारणारी तुझी भावूक नजर ..
प्रतीक्षा  माझ्या उत्तराची ..
अन ..उत्तर ऐकताच ..केलेली घाई अश्रू   लपवण्याची ....!! 
तुला नाही म्हणून गेलो तुझे पासून दूर ..
घरी  आलेवर भरून आला अश्रूंचा पूर ..
आता चहाच्या चटक्याने भानावर आलो ...स्वप्नं सारे भूतकाळात विसरून गेलो .. 
पण ..
या सगळ्यातून बाहेर आलेला  मी ..
कायम तुझेसाठी कुढत आहे ..
आणि त्या चहाच्या कपात अजूनही ..तुझंच  प्रेम शोधत आहे .....!!

पाखरू होऊन पाखराशी बोलायचं..


मन मोकळं, अगदी मोकळं  करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

तुमचं दु:ख खरं  आहे,
कळतं मला,
शपथ सांगतो, तुमच्याइतकंच
छळतं मला;
पण  आज माझ्यासाठी
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन
अंगणभर  पसरायचं.

सूर तर आहेतच; आपण फक्त झुलायचं,
मन मोकळं,  अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

आयुष्यात  काय केवळ
काटेरी डंख आहेत?
डोळे उघडून पहा तरी;
प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत!

हिरव्या रानात,
पिवळ्या  उन्हात
जीव उधळून भुलायचं!
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू  होऊन पाखराशी बोलायचं.

प्रत्येकाच्या मनात एक
गोड  गोड गुपीत असतं,
दरवळणारं अत्तर जसं
इवल्याश्या कुपीत असतं!

आतून आतून फुलत फुलत
विश्वासाने  चालायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी  बोलायचं.

आपण असतो आपली धून,
गात रहा;
आपण असतो  आपला पाऊस,
न्हात रहा.

झुळझुळणार्‍या झर्‍याला
मनापासून  ताल द्या;
मुका घ्यायला फूल आलं
त्याला आपले गाल द्या!

इवल्या इवल्या थेंबावर
सगळं  आभाळ तोलायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन  पाखराशी बोलायचं.

कारण यातले तुला काहीच ठाऊक नाही!


काल एकटाच समुद्रकिनारी फिरता असताना
मी तुझे नाव  त्या रेतीवर लिहिले ..
माझ्या नावासमोर ..
आणि स्तब्ध होऊन बघतच राहिलो ....!
...मस्त सूर्याची सोनेरी किरणे पडली होती त्यावर ..
मधूनच उसळून एक लाट आलीच ..
पुसू नये म्हणून जवळ जवळ अडवाच पडलो ..
पाणी नाही पुसू दिलं ते नाव .....!
थोडावेळ राहू दिलं ..आणि
नंतर हलक्या हाताने पुसून टाकलं ...
स्वतःपुरतेच  मानसिक समाधान ..
आणि आनंद घेतला .....!
एकटाच होतो त्यावेळी समुद्रकिनारी ...
सगळीकडे शांतता ..
पण ..मावळता सूर्य ..
उसळणाऱ्या लाटा ..
आणि पडलेले  शंख शिंपले
आणि मऊ आणि थंडगार रेती ला मात्र
हे प्रकरण ठाऊक झाले  खरे
त्यांचे एक बरे होते
निमूटपणॆ पाहत होते बिचारे
खुप आधार  वाटला या सर्वांचा
वाटले आपण व्यक्त झालो कोणासमोर तरी...!
एकदम  हवेत तरंगत होतो त्या रात्री ..
घरी येऊन लताची रोमांटीक गाणी ऐकली ...
किती  उकळ्या फुटत होत्या म्हणून सांगू...?
त्या रात्री ....
एक पत्र  लिहिलं तुला एकांतात..
झोपच नाही लागली त्या रात्री ....!
अजूनही  तसंच आहे ते पत्र ..
वाचतो अधूनमधून तुझ्या आठवणीत ..
पण आता ते  जीर्ण झालाय वाचून वाचून ..
अगदी तुझ्या-माझ्या सारखं....!

सर्व  काही अजूनही आठवतंय ..
अगदी काल घडल्या सारखं ..
तुला आठवायचे काहीच  कारण नाही ...
कारण यातले तर तुला काहीच ठाऊक नाही ....!

पाऊस..


हेच तर हवं होतं ना तुला..
जे कालपर्यंत मला अशक्य वाटलं..
काल.. काल खूप पाऊस झाला माझ्या घरी..
खूप वादळे आली.. झालं एकदाचं थैमान वाऱ्याचं..
आणि आता.. आता निरभ्र वाटतंय सगळं..
अगदी तुला पाहिजे होतं तसंच..
आज.. आज मी तुझ्या कलेनी घेतोय..
अगदी तुला मी पाहिजे तसाच येतोय..
आज मला नाकारण्याचा तुला अधिकार नाही..
आज तुझ्यात मिरवण्याचा माझा इरादाही नाही..
आज.. आज मी थोडी तडजोड केलीये..
आज तुला तुझ्या मनासारखं झालेलंय..
पण आजही तू जराशी गुमसुमच वाटतेस..
माझं असं येणं अपेक्षित नसावं तुला..
पण मी आलोय आता..
आज तुला पर्याय नाही..
आज मी तुला पाहिजे तसाच आहे..
तरीही मी तुला जरा नकोसाच आहे..
देईन.. तुलाही वेळ देईन मी..
जसा तू दिला काल माझ्यासाठी..
काल पाऊस माझ्या घरी होता..
आज थोडा तुझ्या घरी असेल..
आज थोडा तुझ्याही घरी असु दे..

- रोहित

Thursday, 25 October 2012

क्लासिक..

कुणा कुणाला असं वाटतं रे.. जे क्लासिकपण होतं काल परवापर्यंत.. आपल्या आजुबाजूला..
ज्यात आपण रमलो.. अगदी मनापासून.. मनाची कुठलीही कवाडे न झाकता..
समरसून गेलो ज्यात.. असा जो सुवर्ण काळ.. आपल्या सर्वांच्या आयुष्यातला..
जुने आठवणारे क्षण.. किती छोटेही का असेनात.. पण मनात कोरले गेलेले..
कुणाचा प्रेमळ हात.. कुणाची प्रेमळ साथ.. मस्त होतं काहीतरी..
बबल्या,चिंकी, पिंकीची कहाणी.. अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत हवं होतं.. क्लासिक असं काही..
शाळेची घंटा.. लुटूपुटूच्या मारामाऱ्या.. आपल्या हुशार फुशारक्या..
पोरांच्या कॉप्या.. गुरुजींच्या काठ्या.. सारं काही क्लासिक..
सायकलवरचे दिवस.. खिशात नव्हता पैसा.. तरी गाव विकत घ्यायला निघालेली स्वारी..
उगाच मारलेल्या फेऱ्या.. २० पैश्याच्या गोळ्या.. त्याच्या चौघात वाटण्या.. सारं सारं क्लासिक..
उन्हाळ्यात पडलेली उन्हं.. झाडाखालच्या सावल्या..
कुठं रमलेल्या रम्म्या.. गोट्यांचे पडलेले डाव.. सारं सारं क्लासिक..
गावाच्या टेकडीवरचं हनुमानाचं मंदिर..
मंदिराचा कट्टा.. कट्ट्यांवरची लोकं.. गप्पा कुटणारी पोरं.. सारं सारं क्लासिक,,
रविवारच्या मालिका.. अलिफ लैला.. शक्तिमानच्या..
बुडवलेली अर्धी शाळा.. बुडवलेल्या शिकवण्या.. मास्तरचं ओरडणं..
मटका लागलेल्या परीक्षा.. चुकून पडलेले मार्क.. सारं कसं क्लासिक..
लेन मधल्या कहाण्या..वेणीमधल्या पोरी.. आपल्याला एकीचं आवडणं.. नेमकं काय न समजणं..
सारंच काही क्लासिक..
गावाकडच्या कहाण्या.. गावाकडचं राहाणं.. मनात गोडी साठलेलं.. क्लासिक.. फक्त क्लासिक!!

- रोहित

Tuesday, 23 October 2012

शाप..

एक तर मी पडलो प्रेम कवी. त्यामुळे रद्दीवाल्याकडे जसे सगळे पेपर हमखास येतात तसेच माझे बरेचसे मित्रही माझ्यापाशी ह्या विषयाची रद्दी घेऊन येतात. त्यांचे अनुभव सांगतात. हृदयापासून आलेले असल्यामुळे बरेचशे worth listening असतात. काही तुम्ही कुठे चुकताय हे दाखवणारे असतात. काही पुढच्याला ठेस मागचा शहाणा ह्या धाटणीचे असतात. पण का कुणास ठाऊक. माझ्यापाशी आजवर आलेला एकही प्रेमात यशस्वी नाही.. आणि ह्यात माझा दोष नाही.!!
तर बहुतांश लोकांचा प्रॉब्लेम हा कि त्यांना मुलींचा स्वभावच समजत नाही. तिच्या मनात नेमकं काय आहे हे
जाणण्यासाठी पोरं मनस्ताप करून घेतात. तिच्या वागण्याचं कारण हे एखाद्या अवगड गणितापेक्षाही अवघड वाटतं त्यांना. खरं आहे ते. बाकीचे ताप खूप असले तरी मुली मनमौजी असतात.
एका जवळच्या मैत्रीणीनं केलेला उलगडा असा कि मुली एकट्या कधीच नसतात. त्यांना नको इतकं प्रेम मिळणारच असतं. मिळतंच जातं. त्यांना नको असताना सुद्धा!
मग त्या सरावतात असल्या वातावरणात आणि मग बिनधास्त बनून जातात. मग हा मनमौजीपणा त्यांची हत्त्यारं आणि आपल्यावरचे वार बनून जातात.
पोरं पडली साधी भोळी. त्यांना कोणीच जवळ करत नाही. पोरीनं दाखवलेल्या टिकलीएवढ्या ओलाव्यात त्यांना जिव्हाळा दिसू लागतो. आणि मग पोरी टारटूर करायलाच बसलेल्या असतात. चूक कुणाचीच नाही!!
माझं पोरांना एकाच सांगणं (आणि स्वत:लाही!) कि खरं प्रेम करणं, होणं ह्या गोष्टी गोष्टीतच राहिल्यात आता.
तुम्हाला वाटेल pesimistic आणि अजून काही काही. आपलं नशिब आजमावून या मग बोलू.
सगळं सगळं सगळं infatuation आहे आज. फक्त infatuation! अगणित प्रेम कविता.. अगणित चारोळ्या केलेला, स्वभावाचे सरकत जाणारे पैलू डोळे उघडे ठेऊन पाहिलेला माणूस आहे मी.
महिनाभर लांब राहा अगदी तना मना धनाने.. विसरताल तुम्ही!! अगदी ९९ % लोकांना लागू होईल हे.
ह्या गोष्टींना आयुष्यात स्थान एका timepass पेक्षा जास्त देऊ नका. पोरांनो खास तुमच्यासाठी.
त्या दिवशी मी तिथं होतो हे ऐकायला. अहोभाग्य माझं. गणपतीचे दिवस होते. आणि आमचे आवडते सर काही सांगत होते. म्हटलं तर महत्वाचं. म्हटलं तर काहीच नाही. बोलत होते अगदी मनापासून असं काही.
"हि जी ढोल वाजवणारी मुलं असतात मिरवणुकीत, कशासाठी रे ढोल वाजवतात हि पोरं? पोरींवर impression च पाडायचं असतं ना?! हो तेच तर कारण असतं.. ह्या मिरवणुकात डोळ्यातल्या डोळ्यात किती कहाण्या घडून जात असतील. कुणा मुलीला त्याचं ढोल वाजवणं आवडून जात असेल. तर कुणा मुलाला तिची नववारी साडी आवडून जात असेल. पण पुढच्या क्षणाचं काय.. ती कहाणी एका चौकातल्या वळणावरच संपते! इतकी क्षणभंगुर अशी ही कहाणी. आणि समजा झालंच जर लग्न त्या दोघांचं तर उद्या मुलाच्या admission ला पैसे नसतील तर भांडताना तिला तुमचं ढोल वाजवणं आठवणार नाही. आणि वैतागून मनात चरफडताना तुम्हालाही तिची नववारी साडी आठवणार नाही. किती क्षणभंगुर असतं ना हे सगळं.
तुम्ही दिवसभर किती खपला याला काहीच महत्व नसतं. At the end of the day, what matters is the money. फक्त पैसा!! कटू सत्य आहे पोरांनो पण जितकं लवकर समजताल तेवढं चांगलं आहे"..
काहीतरी ठरवा. पाहिजे तेवढा वेळ घ्या. हे आयुष्य खूप मोठं आहे. पण ठरवलेल्या ध्यासाशी एकनिष्ठ राहा.
ध्येय वेडे व्हा. पोरींच्या मागे धावते मन हा निसर्गाचा शाप आहे. तुम्ही ध्येयाकडे divert करा त्याला. मुली तुमच्या मागे असतील. अगदी १००% ;)

- रोहित

Sunday, 21 October 2012

पाऊस..

खुप वाट पाहिली मी आज..
पावसाची..
तुझी जवळ असण्याची..
तुझं आणि पावसाचं
एक नातंच बनून गेलंय आता..
त्याच्या येण्याचं तू एक
निमीत्तच बनून गेलंय..
तो आला की आठवतात मग..
तुझे माझे आठवण थेंब..
ओंजळीत मग साठवत असतो मी,
मावतील तेवढे क्षण..
.. मातीवर पडणारा आवाज,,
मन बेचैन होऊन जातं..
तुझ्याजवळ घेऊन जातं..
किती दूर आलीस तू आज..
किती एकटा पडलोय मी आज..
मी वाट पाहतोय आज..
पावसाची..
तुझी जवळ असण्याची..

- रोहित

अशी कशी ग तू..

किती साधी ग तू,
ना सजनं ना मुरडनं,
ना लटके झगडणं,
किती सच्ची ग तू..
जे काही असेल ते आतून सजलेलं,
सकाळचं ऊन जसं पावसात भिजलेलं..
किती मन लाऊन जगणारी तू,
किती जीव लाऊन जगणारी तू,,
तुझे ओझरते देखावे जगणं शिकवून जाणारे..
तुझे हसते नजारे हसणं शिकवून जाणारे...
किती वार्यासारखी तू,
किती पाण्यासारखी तू,
वाहत जाणारी .. आपल्याच कलेनी,
वाहावत नेणारी .. स्वैर ओढ्यासारखी..
एवढा का हेवा वाटावा,
तुझ्या जगण्याचा..
तुझं जग बघण्याचा..
एकदा तुझ्या डोळ्यांनी ही दुनिया बघावी म्हणतो..
ती सुंदर भासेल.. नव्हे असेलच!
तुझ्या हातात हात घेउन डोळ्यात हसावं म्हणतो..,
पाणी गालांवर असेल.. किंवा रुसेलच...
तुझ्या असण्याचा आनंदोस्तव जगायचाय..
तुझ्या हसण्याने, तुझ्या सोबत असण्याने...

- रोहित