का ग मन माझं तुझ्याभोवतीच घुटमळतंय
झाले गेले शब्द मधून पुन्हा पुन्हा आठवतंय
माझ्या आनंदाचे मला काहीच न देणे घेणे
तुझ्या केवळ स्मितासाठी माझं जग खळखळतंय
आणि सगळं माहित असून
आणि एवढं सगळं माहित असून
तुझे दुरून डोंगर साजरे गं
असलं कसलं जगणं माझं.. तुझ्यावरचं मरणं
आणि तुला त्याचं काहीच न घेणं देणं
एक क्षण.. फक्त एक क्षण पुरा तुला
माझ्यापासून दुरावण्यासाठी
आणि तो मलाही पुरा होईल
आयुष्यभर झुरवण्यासाठी
वेडा.. मीच वेडा
तुझ्या माझ्या भेटीतल्या शब्दांचा मी वेडा
- रोहित
No comments:
Post a Comment