रात्र नाही, तुही नाही, चंद्र नाही सोबती
तू दिलेल्या मोगऱ्याच्या गंध नाही सोबती
सांग या तारांगणातून मी मला रमवू कसा
तारका न्याहाळण्याचा छंद नाही सोबती..
छेदण्या कडवी शिबंदी, पीर वेडे पाहिजे
भेदण्या पाषाण कट्टर, नीर वेडे पाहिजे
शक्य आहे काहीही! बस्स.. निश्चयाचे बळ हवे
वेधण्या निष्प्रेम हृदया, तीर वेडे पाहिजे!
बुलंद झुंज घेईन सागराशी, फक्त भरती पाहिजे
झुंज देईन वादळाशी, फक्त धरती पाहिजे
मांडले अवघ्या जगणे वैर.., तरी सोसेन मी
संगतीला प्रियतमा अन.. चंद्र वरती पाहिजे!
No comments:
Post a Comment