आता असं वाटतं..
कालपरवापर्यंत जे झरे आतुर होते,
वाटेत येणाऱ्या प्रत्येक क्षणाला भिजवायला..,
ते झरेच आता सुकत चाललेत..
ती निरागसता, ते अर्थपूर्ण जगणं
मनाच्या definition मध्ये बसणारा पूर्णविराम..,
थोडा लांबत चाललाय आता...
बाकी सारवत असतो मी तसा
वरची जमीन बाकी जपून असतो मी,
आतली कस्पटे कितीही माजली तरी..
मजेत दिसतो मी तसा..
स्वत:च्याच आसवांची केलेली लक्तरे,
लोंबतात आतल्या आत..
बंद डोळ्यांनी दिसतात त्या मशाली,
आठवतो तो प्रारंभ..
डौलाने फडकणारी निशाने..,
आणि दिसतो तो आजचा दिवस
एवढा ढिसाळ मी का झालो...
मी शोधणं सोडून दिलंय आता
माझ्यात माझं असणं मी सोडून दिलंय आता..
- रोहित
No comments:
Post a Comment