Tuesday, 18 December 2012

उत्तर..


खुप त्रास देतोय ना मी
वेड्यासारखा करतोय ना मी
माहितेय मला..
मुद्दामच करतोय मी..
मी संभ्रमित आहे..
मला संभ्रमित केलंयस.. तू
एका गोष्टीवरून..
तुझ्या दुनियेत माझं स्थान हललंय तेव्हापासून..
मला एक पुरावा हवाय,
एक साधा पुरावा..
बस.. गाडी पुन्हा रुळावर येईल
पण तू..
तू जाणून सर्व निरागस बनतेस
माझी भीती वाढत चाललीये..
आणि ओघाने दुरावेही..
हे सर्व आता तुझ्या हातात आहे..
प्रश्न आता माझ्या स्वाभिमानाचाही आहे..
मी असा येऊ शकत नाही..
तुझ्या उत्तराशिवाय..
आलो तरी मी तिथे नसेन..
खोटं का असेना,
मला उत्तर हवंय..
मला तुझं उत्तर हवंय....

- रोहित

No comments:

Post a Comment