सगळं किती क्षणभंगुर झालंय ना आज
प्रचंड volatile असं काही
situation मधून पण काय झपझप बाहेर येतात लोकं
इतकी adaptive कि बास
त्यामुळे कशात गुंतणं, प्रेमात अडकणं, संकटात सापडणं..
प्रश्नच येत नाही
alternatives शोधले जातात
प्रचंड alternatives..
आजच्या पिढीची सोयही आणि फुटकं नशिबही
परिस्थितीशी सामना आला कि मार्गच बदलायचे
त्यामुळे कण्याची झालेली कंदमुळे..
इतकं उपरी जीणं..;
वीट यावा असल्या थोडक्यात जगण्याचा..
मुरणं म्हणजे कशाशी खातात असे पडलेले केविलवाणे प्रश्न
प्रेमाची तर मंडईच झालेली..
खरे अर्थ अवशेषांसारखे पुस्तकात सापडतात फक्त..
खरं सांगू
जन्माला येण्याचा हा काळच फसला मुळी
हि वेळ सगळं उरकून निघायची होती
परत जाण्याची होती
७०-७२ मधील तरुणाईची होती
summer of 69..!!
म्हणजे डोळ्यांनी आज ही पडझड पाहताना एवढा तरी आनंद राहिला असता
कि कितीही नकोशे असले तरी आपले इथले क्षण
क्षणभंगुर.. फक्त क्षणभंगुर
- रोहित
No comments:
Post a Comment