Wednesday, 26 December 2012

Why not you..

तू का नाही? why not you??
विसरलास ते ४ दिवस.. ती चांदण्यातली रात्र..?
खरंच.. एकतर नशिबानी जुळून आलेली तिची माझी भेट..
एवढा गोंधळलेलो कि तिनं विचारलेले "तुझे class teacher कोण?" एवढ्या साध्या प्रश्नाला अडखळलेलो..!
तसे दोघेही एकाच junior कॉलेजचे.. वेगळ्या तुकडीतले.. 
जाताना येताना दिसायची कधीतरी.. कधी cycle stand ला.. कधी कॉलेजच्या पाणवठ्यावर..
दिसली कि गालभरून smile द्यायची.. मस्त खळी पडायची तिला.. 
एकदा चोरून नंबर मिळवलेला आणि बहाणा करून फोन केलेला.. कसल्यातरी xerox काढायच्या म्हणून..
बहुतेक ती माझी पहिली हिम्मत असावी.. दुसऱ्या दिवशी ती गर्दीत उभा राहून माझ्यासाठी xerox काढताना दिसलेली..मग तिला आणि तिच्या मैत्रिणीला चॉकलेट्स घेऊन दिलेली..
पुढं.. पुढं काही झालंच नाही आमच्यात.. गणिताच्या क्लासला होती ती.. पण फार तर फार तिची वही नेण्यापलीकडे काहीच न घडलेलं..
का कुणास ठाऊक.. पण एवढे चतुर आम्ही नव्हतोच.. फक्त न्याहाळायचोच फार..
तिच्या उमलत्या हृदयात आमच्यासाठीच्या प्रेमाच्या कळ्या फुलल्याही असतील कदाचित.. पण आम्ही वेचायला होतोच कुठे तिथे.. आम्ही आमच्याच दुनियेत सैरभैर..
आता ऐकतोय तिच्यासाठी गुपचूप वरसंशोधन चालू आहे म्हणून..
आणि हे सर्व जाणून असलेला माझा मित्र त्रासून मला विचारत असतो.. why not you..

- रोहित

No comments:

Post a Comment