दिवस कितीही व्यवहारी गेला तरी
रात्री थोडं senti व्हायला होतं
एकांतात मन खोलवर जातं
आणि मागे वळून पाहायला होतं
अश्या चांदण्या रात्रीत
थोडं घुटमळणं होऊन जातं
आकाशाच्या खजिन्यावरती
भाळणं होऊन जातं
अश्या मोहक रात्री
रातराणीचं झुलवणं होतं
कितीही रुसलं फसलं तरी
दुखरं मन भूलवणं होतं
अश्या हलक्या रात्री
माथ्यावारले भार उतरवायला होतं
भरले सारे रांजण ओतायला होतं
मन वाहायला होतं
अश्या मंद प्रहरी
थोडं थांबणं होऊन जातं
जगत तर असतोच
पण थोडं जगणं होऊन जातं
- रोहित
No comments:
Post a Comment