त्या कोवळ्या जीवांचं आयुष्य..
किती सुंदर असतं ना..
दिवस कसा सुंदर आठवणींचा अल्बम असायचा..
रात्र जास्त कधी पाहिलेलीच नसायची
एका सुंदर दिवसानंतर
त्याची गरजही नसायची..
ना बळजबरी, ना लपवाछपवी
एक मोकळं रान..,
आणि त्यात सोडलेलं मोकळं फुलपाखरू..
आपल्याच नादात हिंडणारं..
एका वर्गात बसणारं..
आणि गाव सारं फिरणारं..
दिवसही कसे हलके फुलके..
पिसांसारखे..
भुर्रकन उडून जाणारे..
आनंदाने रंगलेले..
किती आले किती गेले,
पण कधीही न मोजलेले..
पदरात अलगद येऊन पडलेले..
आठवणीत राहील कायमची,
जपून ठेवील..,
ही इवलीशी दुनिया..
बुकातल्या पिंपळपानासारखी..
- रोहित
No comments:
Post a Comment