Wednesday 16 January 2013

शेजारी..


ती. शेजारीच राहायची. त्यावेळी तिचं वय अंदाजे २४ असावं. उभ्या चेहऱ्याची. तिची केसं म्हणजे त्या काळची famous style होती. मधून भांग पाडून केसांचा कोंबडा करायची. तशी ही माझ्या लहानपणीचीच गोष्ट. मी तेव्हा hardly तिसरीत असेल. एवढा वर्षांचा gap पण मला खूप आवडायची ती. तिच्या करारीपणाच्या तरीही स्मितहास्यातील अदा एका तिसरीतल्या मुलाला आजही लक्षात राहिल्या हे विशेष. तिच्या आईबरोबर तीही मिश्री लावायची. आजूबाजूच्या बायका जमल्या कि तीही त्यांच्यात जमायची. आम्ही बाजूलाच असायचो! आम्हीही लहानच ना! काही कळायचं नाही पण. फक्त निर्मळ नजरेनी पाहत राहायचो. जसं बागेतल्या पाखरूमागं मन धावायचं तसं तिच्यामागेही धावायचं. माझ्यापेक्ष्याही आमच्या छोट्याला जास्त कुरवाळायची ती. म्हणून छोट्याचा राग पण यायचा कधी कधी. पण गाडी परत रुळावर यायची. सकाळच्या उन्हात अंगणात बाजेवर पेपर वाचत बसायची. मीही शेजारी जाऊन खुडबुड करायचो. तिला कळायचंच नाही मला काय पाहिजे ते. आणि मलाही! तिच्यासाठी माझ्यातलं अर्ध चॉकलेट द्यायचो तिला. ती फक्त बघून गालावरून हात फिरवायची, खायची अन परत आपल्या कामात मग्न! आणि तिच्या एवढ्याश्या reply साठी मी दर वेळेस तिला माझ्यातलं अर्ध चॉकलेट द्यायचो. तिचं attention मिळवण्यासाठी काय काय उचापत्या चालूच असायच्या माझ्या. ती स्वयंपाक करताना तिच्या शेजारी जाऊन बसायचो. तिच्याएवढ्याच तिच्या तीन भावांबरोबर त्यांच्या घरी मस्ती करायचो. तिचे पप्पा म्हणजे आमचे favorite अण्णा. फक्त त्यांचं अंग पायानी दाबायचं माझ्या जीवावर यायचं. ती चार वर्ष आमची कधी आली अन कधी गेली मला आणि आमच्या अख्ख्या कुटुंबाला नाही कळलं. आजपर्यंत असा शेजार आम्हाला मिळालेला नव्हता आणि पुढेही नाहीच मिळाला. जाताना सगळ्यांना tata bye-bye  चालू होतं. मी १० वेळा तिच्या रस्त्यात अडखळत होतो. अजूनही तो क्षण आठवतोय. मी आमच्या छोट्याशेजारी उभा, मान वर करून तिच्याकडे पाहत होतो. ती छोट्याला पाप्या देण्यात मग्न होती. आणि एकदम जायच्या वेळेस तिला मी पापी मागितलेली. बस एक पापी आणि नंतरचं तिच्यासंधर्भात काही घडलंच नाही परत.

- रोहित 



No comments:

Post a Comment