Thursday 26 July 2012

Dont you know me by now..

Didnt we laughed
Didnt we on high together
Didnt we spend the time,
Enough to be in eyes each other
Dont you want me near ever
Dont you know me
Dont you know me by now

You read my words the years
Dont you want me whispering in your ears

Dont you feel the way, I felt for hours
Dont you know me
Dont you know me by now

Wasnt you thought of nightmare
That you thought with me you bear
How can you think of drop of tear
Dont you know me
Dont you know me by now


- Rohit

Tuesday 17 July 2012

बाई..

तसं मी स्वतःला आधी mind reader आणि अजून काय काय म्हणवून घ्यायला आवडायचं आणि ते जमतही बऱ्याच लोकांना.. ती काय सिद्धी नाही.. ते परीक्षण आहे..
पण.. पण तिच्या बाबतीत अंदाज साफ चुकला.. अजूनही नेम लागत नाहीये.. नेमका काय आहे तिच्या मनात.. शेवटी बाईचीच जात ती.. एक वेळ बाब्या काय विचार करतोय हे समजणं १००० वेळा शक्य आहे.. पण बाई.. तीचा साचा कधीच एक नसतो.. ती कधीच एकमार्गी नसते.. 'ति'च्या बाबतीत तर भुरळ पडावी ती एवढी गहन निघाली..पण मी म्हणतो.. सगळीकडेच तिरकी चाल कशासाठी? सगळीकडेच game कशासाठी? आपल्या लोकांत सुद्धा? अर्रे मग तुम्ही जगता कधी? मनमोकळे हसता का कधी? प्रत्येक गोष्टीचा एवढा बोऱ्या वाजवण्याची ह्या लोकांना एवढी काय हौस असते.. साध्या साध्या गोष्टीमध्ये ते तुम्हाला पायथागोरस ची आठवण करून देतील एवढ्या क्लिष्ट विचार करणाऱ्या असतात.. उगा म्हणून नाही झाला तो देवदास होता, पारो नाही!! पण एकच वाटतं, खरं आयुष्य जगायचं ना, तर आतबाहेर सारखंच जगा रे.. कशासाठी क्लिष्टपणा? जो सापाशी खेळतो, तोसुद्धा त्या भितीतच वावरत असतो.. मन साफ असणं फार गरजेचं.. जो तुमच्याबद्दल जिव्हाळा ठेवतो त्याच्यासाठी.. आणि तुमच्यासाठीही!!
- रोहित

Saturday 14 July 2012

I'm done with you..

I'm falling..
falling from high..
winds are telling me
that you're gonna die..
I have closed my eyes
thinking of you..
I feel this is it
I wont be their.. its true..
i feel it drills me
it takes my soul out of me
I thought it heals me
I cant find whats wrong in me..
I'm not sure what I'm going through..
i want you to be their
to catch me.. u r the one for me
but I smells you wont..
You wont again I know
I'm gonna die after this...
I dont want belong here
belong around you anymore..
Now its gonna be nothing for me
I'll always runaway from here

runaway whole life..
I dont want this place in me
I dont want you in me
I'm done with you.. I'm done I'm sure..

- Rohit

Monday 9 July 2012

हौस..

ती.. वर्षभरापूर्वी contact मध्ये आलेली..आली तशीच गेलेली.. पुढच्या शिक्षणासाठी.. मी नोकरीला लागलेलो.. ती १ - १.५ वर्षांनी chat ला add झालेली.. मी पण उगाच अर्रे वा .. कुठे होतीस.. हे अन ते.. पोरगी मॉड होती.. त्याच रात्री तिला call केलेला.. आणि call सत्र चालू झालेलं.. रोज जेवण झालं की फोन वर बोलणं सुरु.. काहीही विषय.. पोरांना मुळी हेच कौतुक की पलीकडून मुलगी बोलतेय.. आणि त्यातही मी पाहत आलेलो पोरांचं फोन वर असं कुचूकुचू बोलणं.. मला खरं जाणून घ्यायचा होतं हे लोकं बोलत काय असतात..त्यात मुलींचे नखरे मला नेमकं कसं लागतं आणि तू मला असं बोललेला मला आवडणार नाही हे अन ते.. ४ दिवस बरं वाटलं आणि नंतर बिनबुडाचं.. कुणी मुलगा स्वतःहून कुबूल करणार नाही पण मीच म्हटलं.. थांबू इथं.. काहीतरी बुड बनवू.. मग बोलू.. कुणाही मुलीला हे अपमानास्पद वाटलं असतं.. इथं गाव असल्या कामाला पडलाय.. ते एखाद्याचं पाणी असल्या बाबतीत मुरूच देत नाहीत.. तिलाही असंच वाटलं.. तिच्या एकंदर बोलण्यावरून कळलं.. नीट समजावून सांगितलेलं तिच्यापर्यंत कुठवर पोचलं तिलाच माहित.. पण असला शब्दांचा खेळ माझ्या गळ्यापर्यंत आला होता.. सगळं सोडून भेट एकदा हवं तर असंही सांगितलं.. तिला वाटलं भेटण्यासाठीचीच क्लुप्र्ती ही.. २ दिवसांनी तेही झालं फोन वर.. नंतर उरला सुरला नादच सोडून दिला.. आपण काय बोलतोय हेच जर समोरच्याला समजत नसेल त्याच्याशी बोलून आपणच मूर्खपणा करतो.. मी जी समजलेलो ही त्याच्या पुढची एक पायरी होती.. कसली आणि कशी का असेना हौस फिटली होती.. असले उद्योग आता पूर्णतः बंद..  असली फालतुगिरी आता पुन्हा होणे नाही..

- रोहित

Tuesday 3 July 2012

चैतन्य..

मी आणि माझा मित्र कौस्तुभचं बोलणं चाललं होतं. एका अफाट अश्या मैदानावर.. अफाट विषयावर..
चांदण्या रातीत.. आयला.. हे दिवस आम्ही पुढं जाऊन नक्की आठवणार.. वादच नाही..!
अश्या वातावरणात मुळी तत्वज्ञान पाझरतंच..  तो सौंदर्याची व्याख्या सांगत होता.. मी ऐकत होतो..
"सौंदर्य हे दिसण्यावर नसतं असं म्हणणंच चुकीचंय.. खिरापतीत का होईना.. पण मिळालेल्या सौंदर्याला किंमत आहे..
पण ते उठून दिसतं त्या सुंदरीच्या अदा.. नजकतींवर"..!!
माझंही मातीत रेघोट्या ओढत त्याच्या हो ला हो चाललं होतं..
आणि त्यानी तो चपखल शब्द उच्चारला..
तिच्यात.. चैतन्य हवे!!
बास.. वीजच चमकली.. माझ्या डोक्यात आजपर्यंतच्या बेरजा वजाबाक्या झाल्या.. सगळ्यात हाच्चा चैतन्याचाच होता.. मी आजपर्यंत शोधत होतो ते हेच तर कारण होतं.. मला ती आवडण्यामागचं..!! भलेही कमी देखणी असेना.. पण जानदार होती.. चैतन्याने भरलेली होती..
कौस्तुभ ला एक मनापासून टाळी दिली.. माणूस माणसाला आवडण्यामागचं हेच तर एक सगळ्यात मोठं कारण असतं..
तुम्हीच आठवा ना.. तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीचा कोणता चेहरा तुम्हाला आठवतो.. exactly! तीच तर गोम आहे.. :)
 बास.. बास.. बास.. आता ठरवलंय.. पार्टनर भलेही कमी देखणा असेल.., एक वेळ चालेल.. पण लाइफ फुल ऑन जगणाराच पाहिजे..!!

- रोहित

Monday 2 July 2012

एकतर्फी प्रेम..

एकतर्फी प्रेम हे जरी समोरच्या पार्टीला अभिमानास्पद असलं तरी जो ते करतो त्याचा तेवढाच अंत पाहणारं असतं.. झुरणारी पार्टी झुरतच जाते.. वेड्यासारखी.. आणि त्या पाषाण हृदयाला हेच हवं असतं.. हे ही नसेल तरी किमान त्याला सुखावणारं तर असतंच..
म्हणतं कुणी कुणी.. प्रेमात passion हवं, समोरची पार्टी कितीही नाही म्हटली तरी.. साफ खोटं आहे ते.. समोर त्या दृष्टीने थोडा तरी इंटरेस्ट असावाच लागतो.. मग तुम्ही कितीही डोकं आपटा..
तुम्हाला एक सांगू.., खास करून मुलांना..
काय प्रयत्न करायचेत ना, ते जरूर करा.. चलते चलते मधल्या शाहरुखच्या 'काश..' च्या म्हणण्यानुसार..! त्या प्रयत्नांची व्याख्या मी तुमच्यावर सोडतो.. पण तेही करून हातात काहीच आलं नाही तर.. तर झुरू नका.. काहीही करा पण झुरू नका.. तुमच्या झुरण्यात तिचं यश आहे..
तुम्ही सुखात रहा.. तिला दाखवण्यासाठी नव्हे, तुमच्यासाठी ! मग हे कितीही अवघड गेलं तरी चालेल..

- रोहित