Friday 8 November 2013

हरवलेली..

वेडा होतो मी. खरंचच वेडा होतो तुझा.
ते एक वर्ष तुझ्याबरोबरचं..
वाऱ्यासारखं उडून गेलेलं.
शाळा संपली आणि पुढे मी ही सोडून गेलेलो.
पुढे काय झालं, खरंच माहित नाही मला.
पाणी मात्र पुलाखालून बरंच वाहून गेलेलं.
आलो होतो कि एक दोनदा, आठवत असेल तुला..
कधी तू माझ्या, कधी मी तुझ्या घरी गेलेलो.
जमलं नव्हतं बोलणं तरी वेळ निभावत गेलेलो.
लहान ना? खरंय तुझं.. आपण लहानच होतो तेव्हा.
डोळ्यात होती सच्चाई पण लुटूपुटूचाच खेळ पुन्हा.
आणि पुढच्या पुढच्या सुट्ट्यामध्ये वेडगळ माझी चालायची
तुमच्या कोपऱ्यावरच्या बंगल्यावरून सारखी सायकल माझी फिरायची.
नजर तुमच्या कोपऱ्यावरच्या कठड्यावरती खिळायची.
अभ्यास करताना नेहमी जशी तूच तिथे दिसायची.
भिरभिर नजरा तुला शोधायच्या, बंद खिडकीत डोकवायच्या.
आणि हताश नजरा माहित असून मोकळ्या घरावर फिरायच्या.
.. जशी होतीस मस्त होतीस, हसून खेळून राहिलेली
गार वाऱ्याची झुळूक जशी स्वप्न रंगवून गेलेली

- रोहित

Friday 1 November 2013

New Point of Direction..

सलग ५ वा महिना.. मी इथे फक्त कामच करतोय.. वेड्यासारखा.
स्वप्नातही वाटलं नव्हतं मी एवढा कधी serious होईल.
इथे आल्यापासून कसलीही फालतुगिरी नाही, वाढवायच्या स्टोऱ्या नाही,
नसत्या गप्पा मारणे नाही अन चकाट्या पिटत ग्रुप करून फिरणे नाही.
Very sincere and professional behavior till now!!
कोणत्याही कामाला नाही म्हणालो नाही कि कंटाळा केला नाही इथे आल्यापासून.
Good going yarr. कुछ पाने के लीये कुछ खोना पडता है. आणि खो दिया तर खो दिया.
कुठे काय कमावलं जे गेल्या २ वर्षात नसते उद्योग करून मिळालं.
नव्हतं काम तेव्हा केली मजा. आता No Excuses!
सगळं गेलं xxxx आणि स्वार्थी बनलो. उशिरानी का होईना चांगल्या संधीसह अक्कल पण चालून आली म्हणायची.
काही चुकीचं नाहीये जे काही चाललंय ते.
उलट नको एवढ्या मजा आणि चुका करून आज आपण येथे आहोत हे का थोडे असावे.
मस्त experience घेऊ अजून २ वर्ष जमेल तेवढा आणि आपल्या पायांवर पुढची अस्मानी उडी घेऊ.
A proper gear at proper time वो भी इतना कुछ होणे के बाद! Not bad at all.!
आणि जे काही होतं ना यार, ते चांगल्यासाठीच होत असावं.
नाहीतर आपण एवढे तापलोच नसतो आयुष्यात! कुणाचा टर्निंग पॉइंट काय असावा त्याचा नेम नाही.
जिंदगीये ना यार, कधीच कुणाची पवित्र राहून पार पडत नाही.
त्यासाठी चिखलात उतरावंच लागतं त्याला.
अंगाला चिखल लागल्याची सल मनात घेऊन चालण्यापेक्षा ते विसरून पुढे चालणाराच famous होतो ह्या दुनियेत.
तरीही बस झाला आपला स्वभाव गावभर दोस्त बनवण्याचा आणि प्रवाहाविरुद्ध पोह्ण्याचा.
त्यापेक्षा काठावर बसून मासे मारत बसणंच योग्य दिसतंय मला. आपण बरं आणि आपलं काम बरं.
And I think I'm in diplomatic stage of young generation now..

- रोहित