Saturday 11 August 2012

Days

माझं लहानपण.. मी लहानपणी स्वतःतच खूप रमलो.. मैदानी खेळही जेमतेमच खेळले.. टीव्हीच जास्त पाहिला.. कार्टून्स पाहिले..
रात्री ९ ला डोळे तारवटून जय हनुमान पाहिलं.. सकाळी उठल्यावर duck tales पाहिलं.. अल्लादिन, श्रीकृष्ण, अलिफ लैला रविवार सकाळचे पोहे खाता खाता पाहिलं.. खरंच.. खूप निरागस आणि स्वच्छंदी दिवस घालवले मी.. दुपारी आई झोपल्यावर चोरपावलांनी साऱ्या घरभर फिरलो.. झाडूचे फटकेही खाल्ले.. रविवारी सकाळी चालू केलेला टीव्ही संध्याकाळी ६ चा loren and hardy पाहून झालं की आख्खा दिवस अभ्यास न केल्याचं tension यायचं.. उन्हाळी सुट्ट्यात मामा, मावश्यांकडे यायचो.. भावंडांबरोबर खेळायचो, भांडायचो, प्रेम करायचो.. सोसायटीतल्या पोरापोरींशी मैत्री करायचो.. महिनाभर थांबून घरी जाताना पाय निघायचा नाही.. येताना एस.टीत सुट्टीतली सगळी मजा ढगात दिसायची.. परत इयत्ता नवी, वर्ग नवे, चक्रे नव्याने फिरायची.. आणि थोड्या दिवसात त्यालाही सरावायचो.. आता... आता फक्त चक्रे राहिलीयेत.. काहीच बदल नसणारी, निरागस नसणारी.. अर्थ नसणारी.. फिरतायेत.. वेगाने धावतायेत.. रात्री ९ ला जागणं मुश्कील वाटणारे डोळे आज रात्री २ वाजेपर्यंत जागतायेत.. कारण काही कळत नाही.. खरंच कळत नाही..

Tuesday 7 August 2012

अजब..

समजत नाही यार.. काय राहून गेलं माझ्याकडून.. जे इतके वर्ष होऊनही तू माझ्यापासून दूर राहिलीस.. तुला माझी ओढ लागली नाही..
It was an absolute try that one ever did in their subconscious state and simplicity (To just be a friend!! Yes!!!). तू मला ओळखूनही माझ्याशी अनोळखी वागलीस.. आजही वागतेस.. हसू येतं मला.. जेव्हा आपण आजपण त्याच पहिल्या पायरीवरून गप्पा मारतो.. meaningless वाटतं मग हे असलं तुझ्याबरोबर असणं.. स्त्री जातीनं जपून राहावं अनोळखी लोकांपासून.. पण इतकं की समोरच्याला जरा सुद्धा विश्वासात न घेणं.. इतकी वर्ष उलटूनही? अगदीच न समजणारं कोडं वाटतंय मग हे आता.. त्या सहजपणाचा, त्या मोकळेपणाचा आनंदच तू गमावून बसतीयेस.. प्रत्येक वेळी संकोच, प्रत्येक वेळी आपलेपणाची test.. बस न यार.. अजून किती दिवस.. किती अंत पाहणारा आहे हे.. अशी नाती टिकतात मग.. एक दिवस तुटण्यासाठीच.. वाट पाहत बसायची मग.. त्या दिवसाची.. वेड्यासारखी.. खूप अजब..!!