Saturday 11 August 2012

Days

माझं लहानपण.. मी लहानपणी स्वतःतच खूप रमलो.. मैदानी खेळही जेमतेमच खेळले.. टीव्हीच जास्त पाहिला.. कार्टून्स पाहिले..
रात्री ९ ला डोळे तारवटून जय हनुमान पाहिलं.. सकाळी उठल्यावर duck tales पाहिलं.. अल्लादिन, श्रीकृष्ण, अलिफ लैला रविवार सकाळचे पोहे खाता खाता पाहिलं.. खरंच.. खूप निरागस आणि स्वच्छंदी दिवस घालवले मी.. दुपारी आई झोपल्यावर चोरपावलांनी साऱ्या घरभर फिरलो.. झाडूचे फटकेही खाल्ले.. रविवारी सकाळी चालू केलेला टीव्ही संध्याकाळी ६ चा loren and hardy पाहून झालं की आख्खा दिवस अभ्यास न केल्याचं tension यायचं.. उन्हाळी सुट्ट्यात मामा, मावश्यांकडे यायचो.. भावंडांबरोबर खेळायचो, भांडायचो, प्रेम करायचो.. सोसायटीतल्या पोरापोरींशी मैत्री करायचो.. महिनाभर थांबून घरी जाताना पाय निघायचा नाही.. येताना एस.टीत सुट्टीतली सगळी मजा ढगात दिसायची.. परत इयत्ता नवी, वर्ग नवे, चक्रे नव्याने फिरायची.. आणि थोड्या दिवसात त्यालाही सरावायचो.. आता... आता फक्त चक्रे राहिलीयेत.. काहीच बदल नसणारी, निरागस नसणारी.. अर्थ नसणारी.. फिरतायेत.. वेगाने धावतायेत.. रात्री ९ ला जागणं मुश्कील वाटणारे डोळे आज रात्री २ वाजेपर्यंत जागतायेत.. कारण काही कळत नाही.. खरंच कळत नाही..

No comments:

Post a Comment