Tuesday 17 July 2012

बाई..

तसं मी स्वतःला आधी mind reader आणि अजून काय काय म्हणवून घ्यायला आवडायचं आणि ते जमतही बऱ्याच लोकांना.. ती काय सिद्धी नाही.. ते परीक्षण आहे..
पण.. पण तिच्या बाबतीत अंदाज साफ चुकला.. अजूनही नेम लागत नाहीये.. नेमका काय आहे तिच्या मनात.. शेवटी बाईचीच जात ती.. एक वेळ बाब्या काय विचार करतोय हे समजणं १००० वेळा शक्य आहे.. पण बाई.. तीचा साचा कधीच एक नसतो.. ती कधीच एकमार्गी नसते.. 'ति'च्या बाबतीत तर भुरळ पडावी ती एवढी गहन निघाली..पण मी म्हणतो.. सगळीकडेच तिरकी चाल कशासाठी? सगळीकडेच game कशासाठी? आपल्या लोकांत सुद्धा? अर्रे मग तुम्ही जगता कधी? मनमोकळे हसता का कधी? प्रत्येक गोष्टीचा एवढा बोऱ्या वाजवण्याची ह्या लोकांना एवढी काय हौस असते.. साध्या साध्या गोष्टीमध्ये ते तुम्हाला पायथागोरस ची आठवण करून देतील एवढ्या क्लिष्ट विचार करणाऱ्या असतात.. उगा म्हणून नाही झाला तो देवदास होता, पारो नाही!! पण एकच वाटतं, खरं आयुष्य जगायचं ना, तर आतबाहेर सारखंच जगा रे.. कशासाठी क्लिष्टपणा? जो सापाशी खेळतो, तोसुद्धा त्या भितीतच वावरत असतो.. मन साफ असणं फार गरजेचं.. जो तुमच्याबद्दल जिव्हाळा ठेवतो त्याच्यासाठी.. आणि तुमच्यासाठीही!!
- रोहित

No comments:

Post a Comment