Tuesday 3 July 2012

चैतन्य..

मी आणि माझा मित्र कौस्तुभचं बोलणं चाललं होतं. एका अफाट अश्या मैदानावर.. अफाट विषयावर..
चांदण्या रातीत.. आयला.. हे दिवस आम्ही पुढं जाऊन नक्की आठवणार.. वादच नाही..!
अश्या वातावरणात मुळी तत्वज्ञान पाझरतंच..  तो सौंदर्याची व्याख्या सांगत होता.. मी ऐकत होतो..
"सौंदर्य हे दिसण्यावर नसतं असं म्हणणंच चुकीचंय.. खिरापतीत का होईना.. पण मिळालेल्या सौंदर्याला किंमत आहे..
पण ते उठून दिसतं त्या सुंदरीच्या अदा.. नजकतींवर"..!!
माझंही मातीत रेघोट्या ओढत त्याच्या हो ला हो चाललं होतं..
आणि त्यानी तो चपखल शब्द उच्चारला..
तिच्यात.. चैतन्य हवे!!
बास.. वीजच चमकली.. माझ्या डोक्यात आजपर्यंतच्या बेरजा वजाबाक्या झाल्या.. सगळ्यात हाच्चा चैतन्याचाच होता.. मी आजपर्यंत शोधत होतो ते हेच तर कारण होतं.. मला ती आवडण्यामागचं..!! भलेही कमी देखणी असेना.. पण जानदार होती.. चैतन्याने भरलेली होती..
कौस्तुभ ला एक मनापासून टाळी दिली.. माणूस माणसाला आवडण्यामागचं हेच तर एक सगळ्यात मोठं कारण असतं..
तुम्हीच आठवा ना.. तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तीचा कोणता चेहरा तुम्हाला आठवतो.. exactly! तीच तर गोम आहे.. :)
 बास.. बास.. बास.. आता ठरवलंय.. पार्टनर भलेही कमी देखणा असेल.., एक वेळ चालेल.. पण लाइफ फुल ऑन जगणाराच पाहिजे..!!

- रोहित

4 comments: