Wednesday, 28 November 2012
अश्या रात्र प्रहरी..
दिवस कितीही व्यवहारी गेला तरी
रात्री थोडं senti व्हायला होतं
एकांतात मन खोलवर जातं
आणि मागे वळून पाहायला होतं
अश्या चांदण्या रात्रीत
थोडं घुटमळणं होऊन जातं
आकाशाच्या खजिन्यावरती
भाळणं होऊन जातं
अश्या मोहक रात्री
रातराणीचं झुलवणं होतं
कितीही रुसलं फसलं तरी
दुखरं मन भूलवणं होतं
अश्या हलक्या रात्री
माथ्यावारले भार उतरवायला होतं
भरले सारे रांजण ओतायला होतं
मन वाहायला होतं
अश्या मंद प्रहरी
थोडं थांबणं होऊन जातं
जगत तर असतोच
पण थोडं जगणं होऊन जातं
- रोहित
College life..
College life संपलं आणि जगण्याचा oxygen च संपला
दिवस आता राहिलेत नुसतेच रटाळ..तेचतेच
झालाच जरा वेगळा तर जीवावर उठणारे..
कॉलेजात असतानाच्या सकाळ सुखद असायच्या..
आपसूक अंथरूनातून उठवायच्या..
कसली तरी उमेद असायची त्या उठण्यात
आज तोच जरा प्रयत्न करून बघितला..ती सकाळ जरा जागवायला बघितली, नाही जमलं...
वेडा होतो मी..कधी एकदा college संपतंय याची वाट पाहणारा
कॉलेजात असताना आठवतंय..
मनात नसताना study room मध्ये अभ्यास केलेला... नावालाच!
वेळ नसताना शेवटपर्यंत concept clear केलेला...शेवटचा paper ही तसाच दिलेला!!
पोरं पण एक एक नग
एकेकाचे वेगळेच पैलू,वेगळंच गणित..
प्रत्येकाला पदव्या बहाल केलेल्या..
प्रत्येकजण आपापल्या कामात हुशार..
पाहिजे ते lecture नेमके miss झालेलं..
टुकार lecture मन मारून attend केलेलं..
सगळं सगळं आठवतंय....
आज तेच lecture miss करतोय... त्यातला आनंद miss करतोय..
त्या दिवसात जगताना हवेत oxygen असायचा..
आज तो सोडून सगळे हवेत आहेत..!!
- रोहित
Tuesday, 27 November 2012
ढगातली नाती..
का कुणास ठाऊक
पण काही वाटलंच नाही मला
तुझ्या लग्नाची बातमी
उडत उडत आलेली
अन तशीच उडत गेलेली
कुठेही न शिवता..
२ वर्षांचा लेखाजोखा
२ क्षणात संपलेला..,
इतकी उथळ नाती...
विट आलाय आता
हृदयात जाणारी कंपनं,
हृदयातच सामावणारी नाहीत राहिली आता
सगळं क्षणिक वाटतं आता..
नाराज.. नाराज तर तसाही नाहीये मी
फक्त हताश झालोय थोडा,
या ढगातल्या नात्यांशी..
मान खाली अन मुसक्या बांधाव्यात आता
अन फिरावं गोल गोल
कुणाशी न देणं घेणं
फक्त जात्यातलं जगणं
फक्त जात्यातलं जगणं..
- रोहित
Friday, 23 November 2012
चारोळ्या..१
तुझ्याविना क्षण
क्षणांविना मन अडते
सरतेशेवटी मनाविना
माझे जगणेच टांगते
असावा असा समुद्रकिनारा
असावे फक्त तू अन मी
वेचण्या धन डोळ्यांतले
असावे पारखी.. तू अन मी
आहेच तसा मी
वरकरणी जगणारा
गप्प गप्प राहून
खूप काही करणारा
पाण्याच्या थेंबातही मी तुला पाहिले होते
सळसळत्या वाऱ्यालाही भान तुझे राहिले होते
दरयाखोरयात वाहिलेल्या आकांत सादाला
मी कणाकणाने झिजलेले प्रतिसाद पाहिले होते
मी तुझ्यात राहिलो
राहताना पहिले
असे दिस सुखाचे
सरताना पहिले
खूप काही बोलायचं होतं
सगळं काही राहून गेलं
वाहते दिवस सोबत म्हणून
मन माझं वाहून नेलं
तुझ्या प्रेमळ आठवणींना
रात्रीस केव्हातरी जाग आली
क्षण ना क्षण जोडत गेले
अन रात्रीची सकाळ झाली
दिवसांमागून वर्षे सरली
एकच उल्का शोधत होतो
त्या वळणांवर वावरताना
माझा गलका उगाच होतो
कुठे होतीस तू
मला परत वाटलं नाही
तू कधी परत येशील
हेच मला पटलं नाही
मनी माझ्या साठलेलं
खूप काही वाटलेलं
बेभान असं एक पिलू
सैरावैरा सुटलेलं
निवांत क्षणी एखाद्या राती
खोलवर खळबळ चालायची
गावभर फिरून आलो कि
झोपच मला रागवायची
उगाच का ग सांग मला
सोन्यात हिरा जडवायचा
उगाच का बघून तुला
गाव मला चिडवायचा
- रोहित
चारोळ्या..
रात्र नाही, तुही नाही, चंद्र नाही सोबती
तू दिलेल्या मोगऱ्याच्या गंध नाही सोबती
सांग या तारांगणातून मी मला रमवू कसा
तारका न्याहाळण्याचा छंद नाही सोबती..
छेदण्या कडवी शिबंदी, पीर वेडे पाहिजे
भेदण्या पाषाण कट्टर, नीर वेडे पाहिजे
शक्य आहे काहीही! बस्स.. निश्चयाचे बळ हवे
वेधण्या निष्प्रेम हृदया, तीर वेडे पाहिजे!
बुलंद झुंज घेईन सागराशी, फक्त भरती पाहिजे
झुंज देईन वादळाशी, फक्त धरती पाहिजे
मांडले अवघ्या जगणे वैर.., तरी सोसेन मी
संगतीला प्रियतमा अन.. चंद्र वरती पाहिजे!
Wednesday, 21 November 2012
मी न माझा..
आता असं वाटतं..
कालपरवापर्यंत जे झरे आतुर होते,
वाटेत येणाऱ्या प्रत्येक क्षणाला भिजवायला..,
ते झरेच आता सुकत चाललेत..
ती निरागसता, ते अर्थपूर्ण जगणं
मनाच्या definition मध्ये बसणारा पूर्णविराम..,
थोडा लांबत चाललाय आता...
बाकी सारवत असतो मी तसा
वरची जमीन बाकी जपून असतो मी,
आतली कस्पटे कितीही माजली तरी..
मजेत दिसतो मी तसा..
स्वत:च्याच आसवांची केलेली लक्तरे,
लोंबतात आतल्या आत..
बंद डोळ्यांनी दिसतात त्या मशाली,
आठवतो तो प्रारंभ..
डौलाने फडकणारी निशाने..,
आणि दिसतो तो आजचा दिवस
एवढा ढिसाळ मी का झालो...
मी शोधणं सोडून दिलंय आता
माझ्यात माझं असणं मी सोडून दिलंय आता..
- रोहित
Friday, 16 November 2012
वेडी..
ती.. आपल्याच दुनियेत राहणारी..
लोक काहीही म्हणोत.. बिनधास्त जगणारी..
उगाचच शायनिंग स्माईल न देणारी.. गाल भरून हसणारी..
बोर जोक मारणारी.. तरीही वारसा जोमाने चालू ठेवणारी..
acidity झाली म्हणून चहा बंद करणारी.. पण टपरीवर सोबत म्हणून गप्पा मारायला येणारी..
वाढलं वजन तरी कौतुक म्हणून सांगणारी..
तीच तीच smiley शब्दात परत फिरवणारी..
अलिबाग वरून आलेली, काशीद ला जाणारी
पोरींचा लोंढा गरगर फिरवणारी
ज्याला जसं वाटेल त्याला तशीच वाटणारी
आणि चाहत्या लोकांमध्ये भरभरून प्रेम उधळणारी.. एक वेडी
- रोहित
Tuesday, 13 November 2012
Sunday, 11 November 2012
एक और बात..
मी आणि माझा एक मित्र.. एखाद्या शनिवारी, रविवारी बोलायला बसलो कि काय आनंद असतो देव जाणे.
पण आठवडाभर त्रासलेली गणिते जुळवायचा कार्यक्रम होऊन जातो.
एखाद्या विषयाच्या मुळात जाऊन problem solve करू पाहणारी समीकरणे काढू पाहतो..
बऱ्याचदा बरोबर असणारी. फार थोड्या वेळेला फसणारी.
हि खलबते चालतात रात्री ११ च्या पुढेच. सगळं काही सामसूम असताना.
मुळात असल्या गप्पांना रात्रच हवी. दिवसा ह्या गप्पांवर बोलायला कुणाला वेळ नसतो अन मूडही.
मग अश्या रात्रीच्या वेळी फिलोसोफ्या बाहेर येतात. प्रेम प्रकरणे रंगतात.
ती अशीच वागते. तसंच करते. मग तू एक काम कर. ह्या वेळेला तू असंच कर. आयच्या गावात मग बघ..
रंगत जाणारी चर्चा रंगतच जाते. सिगारेटी शिलगावल्या जातात.
प्रचंड टेन्शन असल्यासारख्या सुरात धूर हवेत विरतच राहतो.
जो ऐकतो त्याच्या ऐकण्याच्या इंटरेस्टचा जास्त प्रश्न नसतो.
सांगणाऱ्याला ऐकणारयाचा हवा असतो कान. आणि थोडी सहानुभूती..
इथे जुळणारी नाती थोडी गहीरीच असतात.., दिवसभर फसलेल्या नात्यांपेक्षा..!!
एका हाकेवर गरजेला धावणारे बरेचसे मित्र असेच बनतात.
चांदण्यात नेहमीच्या ठरलेल्या कट्ट्यावर जमताना, थोडे त्याचे चटके शेअर करताना, थोडे आपले सांगण्यात जी मजा असते; भलेही उद्याच्या practical जगात ते फंडे लागू होईलच याची शाश्वती नाही पण तो relief कुठेतरी मनाच्या कप्प्यात पाणी शिंपडत राहतो.
त्याची जमीन कितीही तापत राहिली तरी..!
पण आठवडाभर त्रासलेली गणिते जुळवायचा कार्यक्रम होऊन जातो.
एखाद्या विषयाच्या मुळात जाऊन problem solve करू पाहणारी समीकरणे काढू पाहतो..
बऱ्याचदा बरोबर असणारी. फार थोड्या वेळेला फसणारी.
हि खलबते चालतात रात्री ११ च्या पुढेच. सगळं काही सामसूम असताना.
मुळात असल्या गप्पांना रात्रच हवी. दिवसा ह्या गप्पांवर बोलायला कुणाला वेळ नसतो अन मूडही.
मग अश्या रात्रीच्या वेळी फिलोसोफ्या बाहेर येतात. प्रेम प्रकरणे रंगतात.
ती अशीच वागते. तसंच करते. मग तू एक काम कर. ह्या वेळेला तू असंच कर. आयच्या गावात मग बघ..
रंगत जाणारी चर्चा रंगतच जाते. सिगारेटी शिलगावल्या जातात.
प्रचंड टेन्शन असल्यासारख्या सुरात धूर हवेत विरतच राहतो.
जो ऐकतो त्याच्या ऐकण्याच्या इंटरेस्टचा जास्त प्रश्न नसतो.
सांगणाऱ्याला ऐकणारयाचा हवा असतो कान. आणि थोडी सहानुभूती..
इथे जुळणारी नाती थोडी गहीरीच असतात.., दिवसभर फसलेल्या नात्यांपेक्षा..!!
एका हाकेवर गरजेला धावणारे बरेचसे मित्र असेच बनतात.
चांदण्यात नेहमीच्या ठरलेल्या कट्ट्यावर जमताना, थोडे त्याचे चटके शेअर करताना, थोडे आपले सांगण्यात जी मजा असते; भलेही उद्याच्या practical जगात ते फंडे लागू होईलच याची शाश्वती नाही पण तो relief कुठेतरी मनाच्या कप्प्यात पाणी शिंपडत राहतो.
त्याची जमीन कितीही तापत राहिली तरी..!
Wednesday, 7 November 2012
Monday, 5 November 2012
शेर..
तू टोके
भी तो एक मजा है
तेरी
ख़ामोशी में मेरी सजा है
बरसते है दूर बादल, तड़पते है हम
ये तडपती
बैचेनियाँ, यही तेरी रजा है।
- रोहित
Saturday, 3 November 2012
माझं पहिलं प्रेम..
माझं पहिलं प्रेम
Love at first sight!!
आजूबाजूचं जग गायब होतं क्षणभर..
बाहुलीच होती ती .. शब्दशः बाहुली
सोनेरी केस.. उन्हात रंगलेले
मागे गेलेली एकच वेणी.. जीवघेणी!
हसू जरासं फसलेलं.. गावाला कळून चुकलेलं
पण पाहणाऱ्याला आठवण करून देणाऱ्या
मोगऱ्याच्या शुभ्र कळ्या.. गालभर पसरलेल्या
एखाद्या खोल दरीत घेऊन जाणारे डोळे..
टपोरे काळेभोर डोळे..,एखाद्या हरिणीचे असतात तसे..
स्वभाव.. स्वभाव काही कळला नाही पण
तेवढं मात्र राहूनच गेलं..
पण घोळक्यात फिरायची नेहमी
शेजारीशी बोलायची, अन डोळे चुकवायची नेहमी
एखाद्याला आसमंत दाखवणारी, अस्मानिची अशीच ती
सगळ्यांना भुरळ पाडेल अशी ती.., माझं पहिलं प्रेम..
- रोहित
Friday, 2 November 2012
Thursday, 1 November 2012
मैत्री आपली..
तुला माहितीये
एक तर आधीच विरह दुःखात असायचो
आणि त्यात तूझ्यावरून डोकं उठायचं
झकास वाटतंय आता..
तुझ्यामुळेच..!!
तू.... तू माझ्या लक्षातच आली नाहीस
भांडणं आणि चिडवण्यातच वेळ गेला माझा
हो ना!!
मूर्ख वाटायचीस तू मला
अगदी मनापासून..
अगदीच चुकीचं आहे असंही नाही
पण मस्त वाटतीस आता तू..
अलीकडे बरीच उलगडत गेलीस तू मला
तुझं हसणं.. आपल्याच दुनियेत असणं
तुझं रुसणं.. कुणाच्या कानात फिसफिसणं
सगळंच मस्त वाटायला लागलंय..
तुझी जायची वेळ आली आणि माझी जागं व्हायची
.... तरीही आवरेल मी स्व:ताला
असाच तडा नाही जाऊन देणार
असंच हसत राहू..
भांडत राहू... लटक्या रागाने..
आणि ओरडता रागवतानाही,
असंच फिद्कन हसू..
डोळ्यातल्या डोळ्यांमध्ये....
- रोहित
पिंपळपान..
त्या कोवळ्या जीवांचं आयुष्य..
किती सुंदर असतं ना..
दिवस कसा सुंदर आठवणींचा अल्बम असायचा..
रात्र जास्त कधी पाहिलेलीच नसायची
एका सुंदर दिवसानंतर
त्याची गरजही नसायची..
ना बळजबरी, ना लपवाछपवी
एक मोकळं रान..,
आणि त्यात सोडलेलं मोकळं फुलपाखरू..
आपल्याच नादात हिंडणारं..
एका वर्गात बसणारं..
आणि गाव सारं फिरणारं..
दिवसही कसे हलके फुलके..
पिसांसारखे..
भुर्रकन उडून जाणारे..
आनंदाने रंगलेले..
किती आले किती गेले,
पण कधीही न मोजलेले..
पदरात अलगद येऊन पडलेले..
आठवणीत राहील कायमची,
जपून ठेवील..,
ही इवलीशी दुनिया..
बुकातल्या पिंपळपानासारखी..
- रोहित
तुझं न येणं..
आज तू येणार नाहीस
आज.. आज जसा सूर्य उगवणारच नाही
आज पक्षांची किलबिल नकोशी वाटणार
आज.. आज फक्त असणार.. वाट पाहणं.. निरर्थक असं
माहित असूनही तुझ्या वाटेकडे डोळे लाऊन बसणं..
आज तुझी किंमत नव्याने कळणार..
आधीचीच लाखमोलाची तू..
आज तू अनमोल होणार..
तुझ्या चाहुलींना आज कशाचीच तुलना नसणार..
तुझं न येणं .. आणि माझं झुरणं..
हे दिवसभर चालणार..
हे असं दिवसभर असणार....
- रोहित
Subscribe to:
Posts (Atom)