Friday 8 February 2013

संताप..


fake.. खोटेपणा.. ज्याचा मलाच जास्त तिरस्कार आहे त्याचा मीच भागीदार होताना फार त्रास झालाय.. होतोय! तरीही माझ्याएवढा "आरपार", "crystal clear"  आणि अजून काही काही असणारा असा मीच असं माझ्या colleagues लोकांचं मत. तरीही.. आतलं राजकारण आतल्यालाच माहित! मनात जसं येईल तसं वागायचं वयही राहिलेलं नाही आणि professionalism नावाची ओळी भेळ टुकार management ला न समजलेली तरीही आवडीनं खाल्लेली अशी झालेली गत.
फालतू नियम, शाळेतल्या प्रथा, पैसे देतोय तर काम कराच वरून Revenge घ्या अशी बॉस लोकांची निराळीच आवड. मीच काय इथला प्रत्येकजण काहीही करण्याआधी, बोलण्याआधी दहा वेळा विचार करतो. बिचकून राहतो. कधी काय उकरून निघेल याची guarantee इथे नाही. इथं चांगला performer आजतागायत टिकलेला नाही असा इतिहास आणि इथून जाणारा जास्तीत जास्त कशी लाऊन जाता येईल याचा विचार करणारा. जेवणाच्या सुटीनंतर पोरांचा घोळका अलग फिरणारा आणि पोरींचा अलग. फिरलेच कोणी दोघे तर तिच्या मागे तो, love birds अशी मानचिन्हे मिळणार म्हणजे मिळणार. कुठून सुरुवात झाली या गहाण संस्कृतीला आणि काय राडा करून ठेवलाय इथलं जगणं म्हणजे. तेही IT कंपनीत? इथला जमवलेला छोटासा ग्रुप सोडला तर कुणाशीही देणं घेणं न ठेवावं इतकं मन उडावं आणि त्याबरोबर आपणही उडावं अशी चालणारी रोजचीच खलबते.
बस.. कुणी विचारू दे आता.. काय चाललंय आजकाल.. हे उत्तर पुरेसं ठरेल नेमकं काय ते कळण्यासाठी


- रोहित

No comments:

Post a Comment