पाच सव्वापाच झाले असतील.. नुकताच चहा झालेला
येउन टेकतो तोच फोन वाजला..
"Hello Sweet"
"Yes Mitto"
"एक serious गोष्ट आहे.."
"हा बोल"
"आज कितीला भेटशील?"
"तू सांग"
"९:३०?"
"बात क्या है?"
"भेटल्यावर सांगतेच कि.. चल मी पळते."
खट्याक!! One of the serious conversation we ever had..
पोहोचोस्तोवर नेहमीप्रमाणे ४ वेळा misssed calls झालेले..
पार्सल उचललं आणि जवळच्या कॉफी शॉप मध्ये जाऊन बसलो.
खेचाखेची सुरु करणार तर आज थोडी down वाटली..
"काय झालंय मित..?"
"काही नाही रे!"
मग २ आढे वेढे घेऊन गाडी रुळावर आली.
"अरे तुला जरा लवकर यायला जमू शकतं का?"
"कशासाठी?"
"अरे actually i need your support!"
"ही ही ही"
"पहिले म्हण नाही म्हणणार नाहीस!"
"नाही!!"
"अरे यार जोक नको ना रोह्या, प्लीज"
"ok बोल"
"मला डान्स क्लास लावायचाय!"
"लाव कि मग, बेस्टे!"
"जोडीवाला डान्स! Salsa"
"नेहा नी लावला ना? बरोबर?"
"फालतू उत्तर नाय पाहिजे!"
"माझ्याकडचे पैसे संपलेत राव.."
"मी भरते!!!"
मला शॉक बसला.. मामला १०० % serious होता..
"अरे मित पण अचानक हे काय काढलंस..?"
"हे बघ! ह्या माझ्या राहून गेलेल्या गोष्टी आहेत.. आणि तसाही मी कधी डान्स नाही शिकले.. so.. why not?"
"रे बेटा, पण salsa का?"
तिनं position बदलली.. हातात हात घेतले.. डोळ्यात डोळे घातले.. मला धडकी भरली!
"खरं सांगू.. मी पण कधी ह्या गोष्टींचा experience नाही घेतलेला..
पण i guess ज्याच्यावर आपण एवढं प्रेम करतो,
त्याच्या कुशीत शिरून हलके हलके झुलण्यात जो आनंद आहे, आपलेपणा आहे,
secure feeling आहे.. तुला नाही वाटत?"
तिचे चमकणारे डोळे फार बोलके होते.. बोलताना एक क्षणही भिरभिरले नव्हते..
तिचे हात किंचित दाबत तिच्या डोळ्यांना म्हणालो.. "I love you mittt"
मग तिचं अपेक्षित स्मित हास्य.. मी ह्याचीच तर केव्हापासून वाट बघत होतो..
"तू आधी का नाही सांगितलस मग? आपण घरच्या घरी जरा हातपाय चालवले असते कि!"
"कुणाच्या घरी चालवणार..?"
"ह्म्म्म तेही आहेच.. ठीके.. लावू आपण.. अजून काय फर्माईश..?"
"आहे! तू जिम लाव यार .. १०० वेळा सांगून झालंय माझं.. ह्या Jan पर्यंत काहीही कर."
"त्याचे पैसे?!!"
"आता माझे पैसे संपले!"
"Kamineee..!"
गप्पा सरकत राहतात.. वेळ उद्यासाठी नोंद होत राहते..
- रोहित