Tuesday, 21 May 2013

Heart Of The Matter...


आज सकाळीच एक call आला

जो मला ऐकायचा नव्हता...पण मला माहित होतं तो येईल..
आपल्या दोघांची एक जुनी मैत्रीण फोन वर बोलत होती
म्हणत होती तुला कुणी भेटलंय.. 

... आणि मला आपली सगळी दुर्भाग्यं आठवली
आणि आपण केलेले संघर्ष आठवले
आणि कसा मी स्वतःच हरलो आणि तू ही
आपल्या प्रेमाच्या उघड्या दाराबाहेर हे कसले आवाज आहेत
जे आपल्याला आपल्या प्रेमाच्या समाधानापासून बाहेर फेकतायेत
आणि अजून काहीतरी मिळवण्यासाठी भिक मागतायेत

... मी आता तुझ्याशिवाय जगण्याचा खूप आटोकाट प्रयत्न करतोय
पण मला कधीकधी तुझी आठवण येते
जितकं मला जास्त माहित होतंय.., तेवढं कमी समजत चाललंय 

ज्या सगळ्या गोष्टी मला आधीपासून माहितीयेत.., त्या मी परत एकदा शिकतोय
मी काळजाच्या कोलाहलात उतरण्याचा प्रयत्न करतोय
पण माझी इच्छाशक्ती दुबळी पडतीये
आणि माझे विचार विस्कटतायेत असं दिसतंय
पण मला असं वाटतं की हे सगळं तुला विसरण्यावर अवलंबून आहे
हो तुला विसरण्यावर..
जरी.. तुझं आता माझ्यावर प्रेम राहिलेलं नाहीये
तुझं आता माझ्यावर प्रेम राहिलेलं नाहीये...


 
हा सगळा काळच खूप अनिश्चित आहे
जो खूप शोक करत बसलाय

लोकांची मनं क्रोधाने भरलीयेत
आम्हाला काही पाहिजे तर ती फक्त थोडी सहानुभूती
ह्या रुक्ष युगात
प्रेम कसं काय टिकून राहू शकतं
 
हा सगळा गर्व आणि स्पर्धा हे मोकळे बाहू नाही भरू शकत
आणि जे काही त्यांनी आपल्या दोघांमध्ये आणून टाकलंय
तुला माहितीये ते मला स्वस्थ नाही राहून देणार
 
मी आता तुझ्याशिवाय राहायचा प्रयत्न करतोय
पण मी तुझी आठवण काढत असतो प्रिये
जितकं मला जास्त माहित होतंय.., तेवढं कमी समजत चाललंय
आणि सर्व गोष्टी ज्या मी शोधून काढल्यात, मला त्या पुन्हा शिकाव्या लागणार आहेत
मी काळजाच्या कोलाहलात उतरण्याचा प्रयत्न करतोय
पण
आता सगळंच बदलत चाललंय
आणि माझं हृदय खूप विखुरतंय
पण मला असं वाटतं की हे सगळं तुला विसरण्यावर अवलंबून आहे
हो तुला विसरण्यावर..
जरी.. तुझं आता माझ्यावर प्रेम नाहीये
तुझं आता माझ्यावर प्रेम नाहीये...


 
तुझ्या आयुष्यात आलेली आणि गेलेली ती सगळी लोकं 
त्यांनी तुला कमी दाखवलं, तुला माहितीये त्यांनी तुझा स्वाभिमान दुखावलंय
हे सगळं तू मागेच ठेवलेलं चांगलं आहे, कारण आयुष्य तर थांबणार नाहीये
जर तू तो राग डोक्यात घालून घेतलास , तो तुला आतून बाहेरून खात राहील
 
मला इथून पुढे आनंदी रहायचयपण माझं हृदय खूप विखुरलाय 

आणि मला असं वाटतं की हे सगळं तुला विसरण्यावर अवलंबून आहे
हो तुला विसरण्यावर..
जरी.. तुझं आता माझ्यावर प्रेम नाहीये
तुझं आता माझ्यावर प्रेम नाहीये...
 
मी काळजाच्या कोलाहलात उतरण्याचा प्रयत्न करतोय
कारण माझं अंगावरचं मांस उतरत चाललंय
आणि राख विखुरत चाललीये
म्हणून मी विचार करतोय तुला विसरून जाण्याचा
हो तुला विसरण्यावर..
जरी.. तुझं आता माझ्यावर प्रेम नाहीये
तुझं आता माझ्यावर प्रेम नाहीये...


Even if.. You don't love me anymore..  

- रोहित

www.youtube.com/watch?v=kEQgkor-jgU

No comments:

Post a Comment