Wednesday, 22 May 2013

तू विसरु शकणार नाहीस...


तू विसरु शकणार नाहीस
नदीचा काठ, चमचमतं पात्रं
उतरता घाट, मोहरती गात्रं

तू विसरु शकणार नाहीस
कलंड़ता सूर्य, लवंडती सांज
पक्षांच्या माला, तिमतिमती झांज

तू विसरू शकणार नाहीस
सोनेरी ऊन, पावलांची चाहुल,
ओलखिची खूण

तू विसरू शकणार नाहीस
दिलेला शब्द, ओझरता स्पर्श
दडलेलं प्रेम, मोहरता हर्ष

तू विसरू शकणार नाहीस
भिजलेले डोळे, विरलेली स्वप्न
थिजलेली वाट, उरलेले प्रश्न

तू विसरू शकणार नाहीस आणि
मी ही विसरू शकणार नाही...

- Unknown

No comments:

Post a Comment