हवीये एक जपानी बाहुली..
तिच्या इवल्याश्या डोळ्यात जग बघायला..
सोनेरी केसात हात फिरवायला..
अनुभवायला एक वेगळीच दुनिया..
हवीये एक जपानी बाहुली..
नाजूक हसरं मन जाणायला...
भोळ्या रुपात चिंब भिजायला..
आपलंच जगणं सारवायला..
हवीये एक जपानी बाहुली..
तिचं बोलणं साठवायला..
समजलं नाही तरी आठवून..
दुखरं मन रिझवायला..
हवीये एक जपानी बाहुली...
रुसलेली बघून चिडवायला...
डोळ्यात पाणी आलेलं बघून..
स्वतःचेच डोळे भरवायला..
हवीये एक जपानी बाहुली..
आयुष्यभर सोबतीला...
लोभस हसऱ्या चेहऱ्यानी...
सारं आयुष्य सजवायला...
- रोहित
No comments:
Post a Comment