Thursday, 23 May 2013

प्रवास..

लोकं जगत राहतात.. काही कारण नसताना..
बरीच लोकं.. त्यात मी ही आहे बहुधा..
पूर्वीचा काळ खरंच practical होता या बाबतीत..
संत महात्मे एक उद्दिष्ट ठेऊन जगली..
ज्ञानेश्वर महाराज.. 

आयुष्याचं ध्येय ऐन तारुण्यात पूर्ण झालं.. 
जगणं सार्थक झालं.. समाधी घेतली.. 
आपल्या जगण्याचं ध्येय काय.. Main Aim.!
ठरवायला हवं ना.. आयुष्य उदंड आहे असं समजून एक प्रचंड ध्येय ठेवावं..
एखाद्या स्वप्नपूर्तीचा आनंद अमुल्य पण क्षणिक आहे..
ते पूर्ण करण्यासाठीच्या खटपटीत कष्ट, वेदना आहेत..
आणि हाच काळ खऱ्या आनंदाचा आहे.!
जीवन हा प्रवास आहे आणि त्या प्रवासातच आपलं जगणं आहे..
अगदी आपल्या स्वप्नांसारखंच..
प्रवास करत राहायचा.. स्वप्ने पाहत राहायची..
शेवट कधी ना कधी येणारच आहे..

- रोहित




No comments:

Post a Comment