Sunday, 16 June 2013

चक्रव्युह..

आता असं वाटतं

प्रेम कधी झालंच नव्हतं मुळी

जे चालायचे ते आपल्याच मनाचे खेळ

ते दिसायचं ते असायचं फक्त मृगजळ

आणि त्या मृगजळाला पाणी करायचं ज्ञान

नाहीच पदरी पडलं आजपर्यंत..

चक्रव्युहातल्या अभिमन्युसारखा रस्ताच शोधत राहिलो आयुष्यभर

हाती अर्धवट ज्ञान घेऊन घुसतच राहिलो... आयुष्यभर

त्याच त्या चक्रव्युहात.....

आणि फसत राहिलो ऐन मोक्याच्या क्षणी,

हृदयावर वार झेलून...

दु:ख हरल्याचं कधीच नव्हतं मला

दु:ख राहील स्वप्ने अधुरी राहिल्याचं..

ज्या जोशानी रस्ता शोधत आलो तो जोशच ओसरल्याचं

ज्यांना खुल्या मैदानात उभा न राहू देऊ त्यांनीच मैदान मारल्याचं

आता मुरलेलो आहोत कि पुरून उरलेलो

हेही गणित आज अधुरंच आहे..


- रोहित

No comments:

Post a Comment