ती.. वर्षभरापूर्वी contact मध्ये आलेली..आली तशीच गेलेली.. पुढच्या शिक्षणासाठी.. मी नोकरीला लागलेलो.. ती १ - १.५ 
वर्षांनी chat ला add  झालेली.. मी पण उगाच अर्रे वा .. कुठे होतीस.. हे अन
 ते.. पोरगी मॉड होती.. त्याच रात्री तिला call केलेला.. आणि call सत्र 
चालू झालेलं.. रोज जेवण झालं की फोन वर बोलणं सुरु.. काहीही विषय.. पोरांना मुळी हेच कौतुक की पलीकडून मुलगी बोलतेय.. आणि त्यातही मी पाहत आलेलो पोरांचं फोन वर असं कुचूकुचू बोलणं.. मला खरं जाणून घ्यायचा होतं हे लोकं बोलत काय असतात..त्यात मुलींचे नखरे मला नेमकं कसं 
लागतं आणि तू मला असं बोललेला मला आवडणार नाही हे अन ते.. ४ दिवस बरं वाटलं
 आणि नंतर बिनबुडाचं.. कुणी मुलगा स्वतःहून कुबूल करणार नाही पण मीच 
म्हटलं.. थांबू इथं.. काहीतरी बुड बनवू.. मग बोलू.. कुणाही मुलीला हे अपमानास्पद वाटलं असतं.. इथं गाव असल्या कामाला पडलाय.. 
ते एखाद्याचं पाणी असल्या बाबतीत मुरूच देत नाहीत.. तिलाही असंच वाटलं.. 
तिच्या एकंदर बोलण्यावरून कळलं.. नीट समजावून सांगितलेलं तिच्यापर्यंत 
कुठवर पोचलं तिलाच माहित.. पण असला शब्दांचा खेळ माझ्या गळ्यापर्यंत आला 
होता.. सगळं सोडून भेट एकदा हवं तर असंही सांगितलं.. तिला वाटलं 
भेटण्यासाठीचीच क्लुप्र्ती ही.. २ दिवसांनी तेही झालं फोन वर.. नंतर उरला 
सुरला नादच सोडून दिला.. आपण काय बोलतोय हेच जर समोरच्याला समजत नसेल 
त्याच्याशी बोलून आपणच मूर्खपणा करतो.. मी जी समजलेलो ही त्याच्या पुढची एक
 पायरी होती.. कसली आणि कशी का असेना हौस फिटली होती.. असले उद्योग आता  पूर्णतः बंद..  असली फालतुगिरी आता पुन्हा होणे नाही..
- रोहित
- रोहित
 
No comments:
Post a Comment