Monday, 2 July 2012

एकतर्फी प्रेम..

एकतर्फी प्रेम हे जरी समोरच्या पार्टीला अभिमानास्पद असलं तरी जो ते करतो त्याचा तेवढाच अंत पाहणारं असतं.. झुरणारी पार्टी झुरतच जाते.. वेड्यासारखी.. आणि त्या पाषाण हृदयाला हेच हवं असतं.. हे ही नसेल तरी किमान त्याला सुखावणारं तर असतंच..
म्हणतं कुणी कुणी.. प्रेमात passion हवं, समोरची पार्टी कितीही नाही म्हटली तरी.. साफ खोटं आहे ते.. समोर त्या दृष्टीने थोडा तरी इंटरेस्ट असावाच लागतो.. मग तुम्ही कितीही डोकं आपटा..
तुम्हाला एक सांगू.., खास करून मुलांना..
काय प्रयत्न करायचेत ना, ते जरूर करा.. चलते चलते मधल्या शाहरुखच्या 'काश..' च्या म्हणण्यानुसार..! त्या प्रयत्नांची व्याख्या मी तुमच्यावर सोडतो.. पण तेही करून हातात काहीच आलं नाही तर.. तर झुरू नका.. काहीही करा पण झुरू नका.. तुमच्या झुरण्यात तिचं यश आहे..
तुम्ही सुखात रहा.. तिला दाखवण्यासाठी नव्हे, तुमच्यासाठी ! मग हे कितीही अवघड गेलं तरी चालेल..

- रोहित

2 comments:

  1. why the name is मित...???

    ReplyDelete
  2. Please go through this blog..
    http://mitttttt.blogspot.in/2012/06/chat-life.html
    nice question anyways :)

    ReplyDelete