Friday, 8 November 2013

हरवलेली..

वेडा होतो मी. खरंचच वेडा होतो तुझा.
ते एक वर्ष तुझ्याबरोबरचं..
वाऱ्यासारखं उडून गेलेलं.
शाळा संपली आणि पुढे मी ही सोडून गेलेलो.
पुढे काय झालं, खरंच माहित नाही मला.
पाणी मात्र पुलाखालून बरंच वाहून गेलेलं.
आलो होतो कि एक दोनदा, आठवत असेल तुला..
कधी तू माझ्या, कधी मी तुझ्या घरी गेलेलो.
जमलं नव्हतं बोलणं तरी वेळ निभावत गेलेलो.
लहान ना? खरंय तुझं.. आपण लहानच होतो तेव्हा.
डोळ्यात होती सच्चाई पण लुटूपुटूचाच खेळ पुन्हा.
आणि पुढच्या पुढच्या सुट्ट्यामध्ये वेडगळ माझी चालायची
तुमच्या कोपऱ्यावरच्या बंगल्यावरून सारखी सायकल माझी फिरायची.
नजर तुमच्या कोपऱ्यावरच्या कठड्यावरती खिळायची.
अभ्यास करताना नेहमी जशी तूच तिथे दिसायची.
भिरभिर नजरा तुला शोधायच्या, बंद खिडकीत डोकवायच्या.
आणि हताश नजरा माहित असून मोकळ्या घरावर फिरायच्या.
.. जशी होतीस मस्त होतीस, हसून खेळून राहिलेली
गार वाऱ्याची झुळूक जशी स्वप्न रंगवून गेलेली

- रोहित

No comments:

Post a Comment