Monday, 9 September 2013
Tuesday, 3 September 2013
दुनियादारी..
सगळं सगळं खोटं होतं
इथे फक्त बाजारच होता
मीच डोळ्यांवर चादर ओढून होतो
सगळं काही जाणूनही
ह्या उजाड सत्यापासून मुस्काट लपवून होतो
ती कालची सावली तर कधीच विरलेली
तिच्या केवळ भासात मी इतका वेळ चालत होतो
आजही सापडतात असे बरेच वाटसरू
ज्यांच्या डोळ्यात कालचेच झरे वाहत असतात
तिथे झालेली पाषाणे काळजाचा ठोका चुकवत असतात
त्यांच्या नजरा मला काहीतरी खुणावत असतात
पण नकोसं आहे हे मला, माझी इतक्यात तयारी नाही
मलाही नाही कळत मग मी काय निवडावं
त्यांच्या सोबत जावं कि निभवावी दुनियादारी
नाईलाजास्तव मी परत चादर ओढून घेतो
पण हि चादर मी त्यांच्यातला नसल्याची, स्वतःशीच खोटं वागल्याची
आणि नाही फरक पडत मला मग
काय चाललाय ह्या वाळवंटात
कुणाचा हृदय कळवळतंय, कि कोण तळमळतंय
ह्या निव्वळ भरल्या वेळी, कुणी न माझा, मी न कुणाचा
- रोहित

Subscribe to:
Posts (Atom)