खरं सांगू का.. लग्नाचा विषय टाळतंच आलोय मी आतापर्यंत. आणि पुढेही किमान एक वर्ष काही ऐकणार नव्हतो मी.
पण आमची म्हातारी.. तिनं नेमकं वर्मावरच बोट ठेवलं आमच्या. तिनं direct तुझ्याबद्दलच विचारलं मला.
माझ्या हृदयाचा ठोका शब्दशः चुकला.. You are second desirable woman in my life yarr.. seriously
And being second is not that bad too!!
अरे ती गोरी पाल नव्हती का ११ वी ला आपल्या वर्गातली.. ती माझी आयुष्यातली पहिली choice. आणि तू दुसरी!
तूला माझ्या दादाच्या टिळ्याच्या वेळी पहिल्यांदा पाहिलेली. पहिल्या वेळेस खरं सांगायचं तर एवढी नव्हती भावलीस मला तू. पण माझी अशी बरीच आवडती गाणी आहेत जी पहिल्यांदा मला आवडतंच नाहीत. तसंच काहीसं झालं तुझ्या बाबतीत पण. तू नंतर नंतर आवडतंच गेलीस मला. त्यात तू माझ्याच कॉलेजची, क्लासची. सारखी डोळ्यांसमोर असायचीस. समोर दिसलं कि हसायचीस. आवडलीस यार मला तू. तुझ्यावरच्या कविता तुलाही वाचायला पाठवलेल्या मी तुला. कळलंही असेल तुलाही कदाचित.
आणि आपण आजपर्यंत बोललो नाही ना जास्त. घरच्यांच्या भीतीने म्हणा किंवा relation tree मुळे, मला तर झालं तेच योग्य वाटतंय. उगाच नकळत्या वयात हवी ती माणसं गमावण्यापेक्षा relation फ्रीज होऊन राहिलेलंच बरं. त्यात तू तशी aggressive ही वाटलेलीस मला. दूर राहिलो तेच बरोबर वाटतंय आता. तुला माहित नसेल कदाचित पण positive विचार करतोय आपल्या बाबतीत मी. माझं स्थळ तुझ्याकडे घेऊन जाण्याची बात जेव्हापासून छेडलीये घरी, तेव्हापासून मन stable वाटतंय मला या प्रेम आणि वासनेच्या बाजारात. तुझ्यापुढे इथल्या तिथल्या पोरी, छानछौकीपणा सगळं फिकं वाटतंय आता. कुणा तिसऱ्या मुलीकडे पाहण्याची आयुष्यात मला गरज भासेल असं वाटत नाही आता. फक्त माझं स्थळ जेव्हा येईल तेव्हा.. Please नाकारू नकोस. जीवापाड प्रेम करीन मी तुझ्यावर. तुझ्या मनाची मरगळ, गेलेला मूड.. सगळं मोडून काढीन मी. फक्त एक काम कर. तुझ्यासाठीच पुढे केलेल्या हातात हात द्यायला तू मागे सरू नकोस. बस्स, फक्त एवढीच गुजारीश..!
- रोहित
No comments:
Post a Comment