Saturday, 9 March 2013

ओझं..


उगाच सुंदर बाहुल्या हातात घेऊन मिरवायच्या
का तर बोलायला कुणी नाही
एखादं नातं आपण फुल म्हणून जपायचं
आणि पुढच्याची पुतळ्याची भूमिका असायची
आणि तरीही आपण चालवून घ्यायचं
का तर सोबत कुणी नाही
आणि उगाचच का निभवत राहायची मग
फक्त मिरवायची म्हणून पाठीवर वाहत राहायची
हि असली रस नसलेली, कस नसलेली नाती
मग निभवायची तरी कशाला
जर कागदोपत्रीच नसतील तर
द्यायचे तोडून मग पाश उरलेसुरले
आपणच आपल्याभोवती बांधून घेतलेले
आपण पण व्हायचं मोकळं मग
त्रास.. त्रास तर असलेल्याचाही होताच कि
नसलेल्याचाही होतो का आजमावून तर पहा
मन तर वेडंच होतं ते, त्याला थोडं समजावून तर पहा
आठवण साठवण करतंच आलास
आठवणीत तर आयुष्य बरबटून गेलंय,
थोडं जमलं तर विसरून पण पहा
आणि जमलं एवढं सगळंच तर एवढं कळून रहा
दुखतातच असली दुखणी तर इथून पळूनच रहा
आणि तेवढीच राखून ठेवशील मग
जी तुला रोज उशाला लागतील
अन जी तुझ्या रोज उशाला असतील..

- रोहित

No comments:

Post a Comment