Saturday, 26 January 2013

Love..

Yes.. I want you
I want you to be in my dreams, every night
I want me to stay here, in your shadow, every sight
I want to be in every corner of your way
For you to just see me..
For you to have a chance,
To look somewhere and have flying glance..
And in leisure to look into my eyes,
To keep deep pleasure and just to smile
We don't need the words
We don't need them anyway..
Since when I met you, you met me, you know my highness..
Your smile, Your pretty face
It makes me feel,
It all belongs to me..
The princess fallen from sky,
Just to be mine.. yes, you're mine!
The world always wanted a reason
A reason to love, in hidy way
And I keep hiding my eyes by now,
That no one catch inside me
But when it stops at you
It makes something i belong to you
That relates something me and you
It makes me feel I keep shining like a star
Spreading love everywhere and not a single war
You make me rich in all the day
You spread aroma in all my way
You make me feel the one,
give me right to love the one..

- Rohit



Friday, 18 January 2013

Have You Ever Really Loved A Woman..

कुण्या मुलीवर प्रेम करण्यासाठी
तिला समजून घेण्यासाठी
तू तिला खोलवर आतून ओळखून घेतलं पाहिजेस
प्रत्येक विचार ऐक, प्रत्येक स्वप्न बघ
आणि तिला पंख दे जेव्हा तिला उडावसं वाटेल
आणि तेव्हा जेव्हा तू स्वतःला तिच्या बहुपाशातून निसटू शकणार नाहीस असं वाटेल
तेव्हा तू समजून घे की तू त्या मुलीवर खरंच प्रेम केलंयस

जेव्हा तू कुण्या मुलीवर प्रेम करशील तेव्हा तिला सांग की तू खरंच हवी आहेस
जेव्हा तू कुण्या मुलीवर प्रेम करशील तेव्हा तिला सांग की तू खरंच एकमेव आहेस
कारण तिला कुणीतरी हे सांगायची गरज आहे की ते शेवटपर्यंत टिकणार आहे
तर मला खरं सांग की तू कधी खरं खरं कुण्या मुलीवर प्रेम केलंयस का

कुण्या मुलीवर खरं प्रेम करण्यासाठी, तिनं तुझा हात पकडू दे
आणि तेव्हा तुला समजेन की तिला कसला स्पर्श हवाय
तू तिला श्वासातून जाणून घेतलं पाहिजे, तिची पारख केली पाहिजे
आणि तेव्हा ती तुला तुझ्या रक्तात जाणवेल
आणि जेव्हा तुझी न जन्मलेली मुलं तिच्या डोळ्यात दिसतील
तेव्हा तू समजून घे की तू त्या मुलीवर खरंच प्रेम केलंयस

जेव्हा तू कुण्या मुलीवर प्रेम करशील तेव्हा तिला सांग की तू खरंच हवी आहेस
जेव्हा तू कुण्या मुलीवर प्रेम करशील तेव्हा तिला सांग की तू खरंच एकमेव आहेस
कारण तिला कुणीतरी हे सांगायची गरज आहे की तू तिच्याबरोबर नेहमीच राहशील
तर मला खरं सांग की तू कधी खरं खरं कुण्या मुलीवर प्रेम केलंयस का

तू तिला थोडा विश्वास दिला पाहिजेस, तिला बाहुपाशात घेतली पाहिजे
एक छोटीशी कोमल अपेक्षा - तू तिला योग्य वागणूक दिली पाहिजेस
मग ती तुझ्यासाठीच असेन, तुझी चांगली काळजी घेईन
आणि मग हो :) , तू त्या मुलीवर खरंच प्रेम केलंयस

आणि तेव्हा तू स्वतःला तिच्या बहुपाशातून निसटू शकणार नाहीस असं वाटेल
तेव्हा तू समजून घे की तू त्या मुलीवर खरंच प्रेम केलंयस
जेव्हा तू कुण्या मुलीवर प्रेम करशील तेव्हा तिला सांग की तू खरंच हवी आहेस
जेव्हा तू कुण्या मुलीवर प्रेम करशील तेव्हा तिला सांग की तू खरंच एकमेव आहेस
कारण तिला कुणीतरी हे सांगायची गरज आहे की हे प्रेम शेवटपर्यंत टिकणार आहे
तर मला खरं सांग की तू कधी खरं खरं कुण्या मुलीवर प्रेम केलंयस का
मला सांग तू कधी खरं खरं कुण्या मुलीवर प्रेम केलंयस का
Just tell me have you ever really, really, really, ever loved a woman? :)

- रोहित

Wednesday, 16 January 2013

शेजारी..


ती. शेजारीच राहायची. त्यावेळी तिचं वय अंदाजे २४ असावं. उभ्या चेहऱ्याची. तिची केसं म्हणजे त्या काळची famous style होती. मधून भांग पाडून केसांचा कोंबडा करायची. तशी ही माझ्या लहानपणीचीच गोष्ट. मी तेव्हा hardly तिसरीत असेल. एवढा वर्षांचा gap पण मला खूप आवडायची ती. तिच्या करारीपणाच्या तरीही स्मितहास्यातील अदा एका तिसरीतल्या मुलाला आजही लक्षात राहिल्या हे विशेष. तिच्या आईबरोबर तीही मिश्री लावायची. आजूबाजूच्या बायका जमल्या कि तीही त्यांच्यात जमायची. आम्ही बाजूलाच असायचो! आम्हीही लहानच ना! काही कळायचं नाही पण. फक्त निर्मळ नजरेनी पाहत राहायचो. जसं बागेतल्या पाखरूमागं मन धावायचं तसं तिच्यामागेही धावायचं. माझ्यापेक्ष्याही आमच्या छोट्याला जास्त कुरवाळायची ती. म्हणून छोट्याचा राग पण यायचा कधी कधी. पण गाडी परत रुळावर यायची. सकाळच्या उन्हात अंगणात बाजेवर पेपर वाचत बसायची. मीही शेजारी जाऊन खुडबुड करायचो. तिला कळायचंच नाही मला काय पाहिजे ते. आणि मलाही! तिच्यासाठी माझ्यातलं अर्ध चॉकलेट द्यायचो तिला. ती फक्त बघून गालावरून हात फिरवायची, खायची अन परत आपल्या कामात मग्न! आणि तिच्या एवढ्याश्या reply साठी मी दर वेळेस तिला माझ्यातलं अर्ध चॉकलेट द्यायचो. तिचं attention मिळवण्यासाठी काय काय उचापत्या चालूच असायच्या माझ्या. ती स्वयंपाक करताना तिच्या शेजारी जाऊन बसायचो. तिच्याएवढ्याच तिच्या तीन भावांबरोबर त्यांच्या घरी मस्ती करायचो. तिचे पप्पा म्हणजे आमचे favorite अण्णा. फक्त त्यांचं अंग पायानी दाबायचं माझ्या जीवावर यायचं. ती चार वर्ष आमची कधी आली अन कधी गेली मला आणि आमच्या अख्ख्या कुटुंबाला नाही कळलं. आजपर्यंत असा शेजार आम्हाला मिळालेला नव्हता आणि पुढेही नाहीच मिळाला. जाताना सगळ्यांना tata bye-bye  चालू होतं. मी १० वेळा तिच्या रस्त्यात अडखळत होतो. अजूनही तो क्षण आठवतोय. मी आमच्या छोट्याशेजारी उभा, मान वर करून तिच्याकडे पाहत होतो. ती छोट्याला पाप्या देण्यात मग्न होती. आणि एकदम जायच्या वेळेस तिला मी पापी मागितलेली. बस एक पापी आणि नंतरचं तिच्यासंधर्भात काही घडलंच नाही परत.

- रोहित 



Monday, 7 January 2013

कोण.. कुणाचं ..


आज कुणाचं हसू आठवून
आसवं दाटून आली
आज कुणाचं नसणं आठवून
असणं साठवून गेली

आज कुणाचं फसवं रुसणं
फुदकन हसवून गेलं
आज कुणाचं सकाळी गाणं
ओठी चकवून गेलं

आज कुणी आठव आठव
मनात भरून गेलं
आज कुणी झोपलं रान
उठवून पेटवून गेलं

आज तुही नसशील तुझी
असशील फसशील तू
आज तुही खिडकीत बसशील
कुठेच नसशील तू

आज तुला आठवेल काल
उगाच घरभर फिरशील
आज तुलाही वाटेल वाईट
भिजले डोळे पुसशील

उद्या परत येईल मी
परत खोटंच हसशील
उद्या परत माझं सांगणं
अन मलाच वेडं म्हणशील

- रोहित



Sunday, 6 January 2013

शायरी..

तुम भूल जाओगे, ये हमें मंजूर नहीं
तुम भुला पाओगे, इतने भी कमजोर नहीं
हम इन्तेजार करते है, एक नए दौर का
एक नयी सुबह, और कोई शोर नहीं

- रोहित