Saturday, 4 October 2014

बांधील..

खूप बरं झालं असतं
जर क्षणभर हातात हात घेतला असतास
डोळ्यातल्या प्रेयसीला दाद दिली असतीस
काय झालं असतं? तसं पाहिलं तर काहीच नाही..
पाहिलं तर थोडा आपलेपणा वाटला असता.. आधार वाटला असता..
पुढचं काहीही ऐकण्याची तयारी झाली असती
काय झालं असतं? चेहऱ्यावर थोडं स्मित ठेवलं असतंस
कदाचित तो नकार पचवणं सोपं झालं असतं..

ऐकायला.. ऐकायला तर होतोच कि
सांगेल ते कानावर पडलंच कि
पण ते ऐकताना.. कानी शिसं ओतताना
फार रुक्षपणा वाटला
तू कुठेतरी आपली आहेस.. तू तीच आहेस
लवलेशही दिसला नाही चेहऱ्यावर
नसेलही तुझ्या मनी काही
त्यातली तू नाहीस ही.. माहितेय मला
पण एवढीशी माणुसकी.. मी ग्राह्य धरू शकतो!

ठेवायचास ना खांद्यावर हात
बोलायचेस दोन बोल समजुतीचे
एवढाही काही अनोळखी नव्हतो तुला मी
Please वाईट नको वाटून घेऊस
बोलायचं होतं मला
मी ऐकलं असतं तुझं..
तुझ्यावरल्या प्रेमाचा मी आदर केला असता
Ball तुझ्या कोर्टात होता
उत्तर तुझ्या मुठीत होतं
ऐकायला उतावीळ.. मीही अधीर होतो
आणि जे घडलं.. ते पडलं फळ.. ते माझं होतं
मी ते गोळा करून गेलो
वाहवत गेलो लांबच लांब..
तुझ्यापासून शक्य तेवढं लांब
तू दिलेल्या कसल्याच हाकेला बांधील नसलेला
तू दिलेल्या कृत्रिम हास्यालाही देणं नसलेला
तुझ्या असण्यापासून.. शक्य तेवढं लांब

- रोहित