कचरा करायचाच तर अगदी कुणाचाही करता येतो
भल्या भल्या अप्सरेलाही
काडी भावात मोजता येतं
अवघड असतं ते आपलंसं कुणी करण्याचं
पदरात पडलेल्यालाच खरं सोनं म्हणण्याचं
पळत्याच्या पाठी तर दुनियाही पळतेच कि
अवघड असतं ते कुणी आपलं पाहून थांबण्याचं
छंद तर नव्हताच कधी
आकाशातील तारे तोडण्याचा
जमिनीवरचीच एखादी हरिणी
आहे स्वप्न तिला शोधण्याचं
नसेल अप्सरा नाकी डोळी
नाहीये कौतुक नुसत्या दिसण्याचं
उत्तुंग असावी नजर जिची
प्रचंड असावं हृदय जिचं
सामावून घ्यावीत आसवे सारी
समुद्र असावं प्रेम तिचं
वाट पाहत असेन मी अश्या सोबतीचं
- रोहित
भल्या भल्या अप्सरेलाही
काडी भावात मोजता येतं
अवघड असतं ते आपलंसं कुणी करण्याचं
पदरात पडलेल्यालाच खरं सोनं म्हणण्याचं
पळत्याच्या पाठी तर दुनियाही पळतेच कि
अवघड असतं ते कुणी आपलं पाहून थांबण्याचं
छंद तर नव्हताच कधी
आकाशातील तारे तोडण्याचा
जमिनीवरचीच एखादी हरिणी
आहे स्वप्न तिला शोधण्याचं
नसेल अप्सरा नाकी डोळी
नाहीये कौतुक नुसत्या दिसण्याचं
उत्तुंग असावी नजर जिची
प्रचंड असावं हृदय जिचं
सामावून घ्यावीत आसवे सारी
समुद्र असावं प्रेम तिचं
वाट पाहत असेन मी अश्या सोबतीचं
- रोहित