Tuesday, 21 August 2018

A Leo

I believe a Leo's always die hard fan of art. Yes, I breath the importance of art. My whole life is big art museum. And seriously, money don't a play a big role in my life. Not much. I need an art, good music and pure love to survive this boredom. Music rules my soul, heals my soul. I don't give fuck to dime! I will say it confidently here, money ain't nothing to me god dammit!

If I wish, I'll live a life of wanderer. What would have happened, if food and travel is free?
And a small shelter for two or sweet three's? I don't think any cages in the world would've stopped me living this life. I'd have happily lived a life of wanderer. God bless me such a life for any good deeds I ever did.

If anyone asks me which place it would be. Without a second thought the answer would be Himachal..! The song will always be on my lips when I mention Himachal is - Maaye ni meriye, Shimle di raahein.. Chamba kitni door hayee.. Chamba kitni door! Love you Mohith! Himachal would be my first love to spend my life. A food to live, an eyes to see huge mountains, a nose to smell flowers and a tongue to taste every food of my life as it was my last bite. I'm a man who believe living a life to fullest. I wish we both would be there. Up above on the mountains. To see every sunrise and sunset together. Sleeping besides each other, counting stars every night. Holding hands together, taking good care of each other. I wish she should be with me, together, forever, till our last breath together. Yes, I wish we both would count same breath. As alone would be hell in this beautiful heaven. So death will make it even anyway. I wish this beautiful life and beautiful death.
Where penny don't play a big role :) I wish penny shouldn't play a big role.

- Rohit






स्थळ..

हम्म.. आता घरचे स्थळ शोधायला सुरुवात करतील.
तऱ्हे - तऱ्हेची लोकं भेटतील. प्रत्येकाचे वेगळे स्वभाव.
कुणी महत्वाकांक्षी, कुणी demanding, कुणी घरेलू, कुणी लाजाळू.
आपली आवड कुणाला द्यायची हे ठरवायला हवं ना.
त्यात परवाच एक हिंदी सिनेमा पाहिलेला.
एक वेडगळ अशी मुलगी सोनाक्षी सिन्हानं साकारलेली.
मस्त वाटली अख्ख्या पिक्चरभर. अशीच मुलगी पाहिजे यार आपल्याला.
डोळ्यात डोळे घालणारी. मनाचा मागोवा घेणारी. मस्त हसणारी.
जिच्याशी बोलायला २ शब्दांची गरज न भासावी अशी नखशीकांत जिवंत मूर्ती.
आयुष्यातल्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीकडे डोळे उघडे ठेऊन पाहणारी.
आणि फक्त म्हणायचं म्हणून नाही तर खरंचच जीवापाड प्रेम करणारी.
आणि असा जर पाया असेल भेटणाऱ्या एखाद्या हरिणीचा..
तर पुढच्या बऱ्याच गोष्टी दुय्यम ठरतील माझ्यासाठी..!!

- रोहित

Saturday, 2 January 2016

तुझी साथ..

एक बोलायचं होतं.
Just because we are now good friends and we are genuine by hearts....
Not emotional but मी खूप dreamy आहे.
I mean होतो.. फार लहानपणापासून..
बारीक बारीक गोष्टी मधे पण जीव लावायचो..
सुटट्यात मामाकडे यायचो तर घरी परत जाताना अंगणातला दगड घेऊन जायचो.. आठवण म्हणून..
ढगात मला माझे cousins दिसायचे..
खूप खूप एमोशनल होतो मी.. Even आहे..
फक्त जरा दुनियादारीशी ओळख झालीये तसा जरा एक पडदा आलाय भोळ्या मनावर..
पण जे अनुभवलाय ना मी.. खूप precious आहे ते माझ्यासाठी..
मला ते परत एकदा अनुभवायचंय..
मनावर आलेला पडदा बाजूला सारून दुनिया पाहायचीय.. परत त्याच भोळ्या डोळ्यांनी.. तुझ्यासोबत..
एका खऱ्या संगतीत माझ्या आतल्या खऱ्याला मला बाहेर काढायचंय..
त्या कोपर्‍यात लपून बसलेल्याला धीर द्यायचाय.. बाहेर यायला.. मनसोक्त जग अनुभवायला.. तुझ्यासोबत!
तो एकटा नाही बाहेर येणार..
त्या एकट्याला कुणाची तरी साथ हवीय.. आपलेपणाची.. आपल्या माणसाची..
आणि ठराविक बोलायचं,
तर फक्त तुझी!

- Rohit

Sunday, 10 May 2015

Timing ..

Hey,
तू,
तू मला आवडायचीस
मला फार आवडलेल्या,
फार कमी लोकांमध्ये तू यायचीस
तू तेवढीच डोक्यात पण गेलेलीस कधी एकदा
पण संदीप च्या एखाद्या कवितेप्रमाणे
"आता आठवतायेत फक्त काळेभोर डोळे!"
खूप जीवापाड प्रेम केलेलं मी कधी तुझ्यावर
तू पाहिलंही असशील हजार वेळा माझ्या डोळ्यात ते
पण बोललो..
बोललो कधीच नाही मी
त्यावेळी दात ओठ खायचो ना मी तुझ्यावर
आणि नंतरून काय तर संगतच सुटलेली तुझी माझी
एकत्र उठणं बसणंच संपलं त्या नंतर
त्या नंतर.. जेव्हा मी शेवटचं भेटलेलो तुला
आपल्या नेहमीच्या आवडत्या
गप्पा मारायच्या जागी
बोलायला हवं होतं मी अजून काही
किती वेळा चुकावं ना एखाद्या माणसानी
कित्ती कित्ती वेळा
आलेले कितीतरी क्षण दवडून बसलोय मी
मला थोडं धाडस का नाही दिलंस रे देवा
किमान त्यातली थोडी बुद्धी तरी द्यायचीस
आणि बोललो असतो तर काय झालं असतं
नकार घ्यायची तशीही सवय झालीये आता
अजून एक पचवला असता एवढं काय
आणि तरीही अजूनही हेंदकाळतच होतो कि मी
अगदी काल पर्यंत म्हटलं तरी चालेल
का रे एवढे patience 
आणि आज
म्हटलं आज ping करावं सहजच
निरर्थक असं ping
आणि तिने धक्का दिला.. तो येणारच होता आज ना उद्या
काय चाललंय तर म्हणे लग्नाची तयारी!
संपलं ..
अजून एक स्वप्नी सजवलेलं
आपलं म्हणावं असं गाव .. परकं झालेलं
एकदा मनापासून रंगवलेल्या रेषा
आज त्याही मला सोडून गेलेल्या
Timing
Timing फक्त खेळात आणि कॉमेडी मध्ये नसतात
Timing प्रेमातही असतं.. कळलं होतं मला
आज वळलं.

- रोहित

Friday, 9 January 2015

काही गोष्टी..

मुसळधार पाऊस.. तसा कमी झालाय आता
आकाशातील ढगही विरळ केव्हाच झालेत
कधीकाळचं घोंगावलेलं..  रानभर पांगलेलं वादळ
आता शांत झालंय..
लोक दिनचर्येत आलेत.. वाहने रस्त्यांवर आहेत
सगळं आता कसं आलबेल आहे
जसं ते या वादळापूर्वीही होतं..
विसरत चाललाय प्रत्येकजण
दीर्घ अनुभवातला एक एक क्षण
कि काहीतरी जुनं होऊन गेलंय या नगरीत
कुणी या पावसात मनसोक्त भिजलेलं
तर कुणी आडोसा घेऊन थांबलेलं
कुणाला आठवायच्याही नाहीयेत या गोष्टी
परत ती जुनी वेळ झुरवायची नाहीये
भलेही अभिनव का करावा लागेल मग
पण कसं असता ना.. नाही लपवता येत प्रत्येकालाच अश्या गोष्टी
लपवलं जरी तरी परीक्षा पाहतात या गोष्टी
पावसात भिजून कोरडे असल्याचा अभिनय
नाही जमत प्रत्येकालाच..
दिसतात काही गोष्टी डोळ्यातूनही
फक्त जरा खोलवर पाहण्याची परवानगी मिळावी..
आणि करावा मग लोकांनीही स्वीकार
कि आहे प्रेम कुणा वेड्याचं ह्या पावसावर
त्याने वेळ दिलाय ह्या पावसाला
थोडा वेळ तर लागेलच ना..
आणि नाहीच जमलं त्या वेड्याला असं विसरणं
तर सोडून द्यावं मग त्याला त्याच्याच नशिबी ..
तो झुरेल एकटाच.. त्याच्यापुरतं समाधान त्याचं त्यालाच
कराव्यात लोकांनीही मंजूर
कधी असल्याही गोष्टी
असतात कुणी वेडे
कधी शहाण्यांच्याही नगरी

- रोहित

Monday, 15 December 2014

प्रेम म्हणजे..

पुरे झाले चंद्रसूर्य
पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले
पुरे झाला वारा
अकरावीतली प्रेमाची कविता काय मन लाऊन पाठ केलेली. :)
फक्त त्या हरिणीसाठी.. तिनं ऐकावी म्हणून..
काय ते निर्मळ वय होतं, आणि त्या वयात झालेलं ते कोवळं प्रेम.
काहीच वावगं म्हणावं असं मनी नव्हतं.
वाहवत जायचं वय होतं ते.. वाहवत गेलं.. बरं झालं.
कायम लक्षात राहील अशी आयुष्यभराची शिदोरी मिळाली.
प्रेम एकतर्फा असो कि दोन्ही बाजूनी झालेलं,
त्याचं खास असणं मुळीच कमी होत नाही.
ती एक भावना असते. तिचं उमलणं फक्त महत्त्वाचं.
Fandry पिक्चर मधला जब्याच आठवा ना :)
फक्त झुरणं हवं. प्रेयसीवर मनापासून केलेलं प्रेम हवं.
मग तुम्हाला कशाचीच गरज नाही. अगदी प्रेयसीची सुद्धा !
कुण्या कवीला कधी विचारून तर बघा, कोणत्या वयात वाहवत जाऊन खूप कविता केल्या ते.
उत्तर येईल ते याच कोवळ्या वयात :)
त्या वेळची प्रेयसी मनात घर करून जाते.
आपलं पाहिलं प्रेम आपण कधीच विसरत नाही.
ती आपल्या हृदयाच्या मखमलीत जपून ठेवलेली आठवण असते.
आयुष्य सुंगंधीत करणारं अत्तर असतं.
हेच एक प्रेम असतं त्याला कसलाच तराजू तोलत नाही.
ना पैसा, ना घरदार.. काहीच नाही.
फक्त निष्पाप हृदयाने डोळे झाकून केलेली एक गोड चूक असते.
आणि हे असं चुकून झालेलं प्रेम जेवढं मनापासून केलं जातं ना..
ते आयुष्यात कधी पुन्हा एकदा होईल.. शक्यता कमी आहे :)

- रोहित

Saturday, 4 October 2014

बांधील..

खूप बरं झालं असतं
जर क्षणभर हातात हात घेतला असतास
डोळ्यातल्या प्रेयसीला दाद दिली असतीस
काय झालं असतं? तसं पाहिलं तर काहीच नाही..
पाहिलं तर थोडा आपलेपणा वाटला असता.. आधार वाटला असता..
पुढचं काहीही ऐकण्याची तयारी झाली असती
काय झालं असतं? चेहऱ्यावर थोडं स्मित ठेवलं असतंस
कदाचित तो नकार पचवणं सोपं झालं असतं..

ऐकायला.. ऐकायला तर होतोच कि
सांगेल ते कानावर पडलंच कि
पण ते ऐकताना.. कानी शिसं ओतताना
फार रुक्षपणा वाटला
तू कुठेतरी आपली आहेस.. तू तीच आहेस
लवलेशही दिसला नाही चेहऱ्यावर
नसेलही तुझ्या मनी काही
त्यातली तू नाहीस ही.. माहितेय मला
पण एवढीशी माणुसकी.. मी ग्राह्य धरू शकतो!

ठेवायचास ना खांद्यावर हात
बोलायचेस दोन बोल समजुतीचे
एवढाही काही अनोळखी नव्हतो तुला मी
Please वाईट नको वाटून घेऊस
बोलायचं होतं मला
मी ऐकलं असतं तुझं..
तुझ्यावरल्या प्रेमाचा मी आदर केला असता
Ball तुझ्या कोर्टात होता
उत्तर तुझ्या मुठीत होतं
ऐकायला उतावीळ.. मीही अधीर होतो
आणि जे घडलं.. ते पडलं फळ.. ते माझं होतं
मी ते गोळा करून गेलो
वाहवत गेलो लांबच लांब..
तुझ्यापासून शक्य तेवढं लांब
तू दिलेल्या कसल्याच हाकेला बांधील नसलेला
तू दिलेल्या कृत्रिम हास्यालाही देणं नसलेला
तुझ्या असण्यापासून.. शक्य तेवढं लांब

- रोहित